Watermelon Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. मागील हंगामात कमी दर व विषम वातावरणाचा फटका बसल्याने यंदा क्षेत्र किती राहील, याबाबत अनिश्चितता आहे. कलिंगड लागवडीसाठी खानदेशात जळगावमधील चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे हा भाग प्रसिद्ध आहे.

दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत कलिंगड लागवड केली जाते. अनेक शेतकरी केळी पिकात आंतरपीक म्हणून कलिंगडाचे पीक घेतात. तसेच काही शेतकरी कापूस पीक काढून त्यात कलिंगड घेतात. सुरुवातीला लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मागील वेळेस दर बऱ्यापैकी मिळाले होते. मागील वर्षी जागेवर सरासरी चार रुपये प्रतिकिलोचा दर होता. तसेच काही शेतकऱ्यांना विषम वातावरणामुळे नुकसानीचा सामना करावा लागला होता. यामुळे यंदा काही शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन टाळले आहे. तसेच काहींनी लागवड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कलिंगडाचा खर्चही वाढला आहे. त्यात मल्चिंग पेपरचे दर १५०० ते १७०० रुपये प्रतिरोल, असे आहेत. तसेच बियाणेदेखील महाग आहे. या पिकास विद्राव्य खते व महागडी कीडनाशकेदेखील लागतात. दुसरीकडे दरांची हमी नाही. यामुळे अनेकांनी लागवड कमी करू, असा निर्णय घेतला आहे.

खानदेशात दरवर्षी रब्बीमध्ये ८०० ते ९०० हेक्टरवर कलिंगडाची लागवड होते. परंतु यंदा लागवड किती होईल, याबाबत स्पष्टता नाही. लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पूर्वमशागत करून घेतली आहे. तसेच गादीवाफे तयार करून त्यात ठिबकही अंथरली आहे. ही कार्यवाही काही शेतकऱ्यांची झाली आहे. काहींनी डिसेंबरच्या मध्यात लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी कापूस वेचणी पूर्ण करून घेतली जात आहे.

अनेक शतकरी लागवडीसाठी हलक्या ते मध्यम जमिनीची निवड करीत आहेत. या क्षेत्रात पीक जोमात येते, असे शेतकरी मानतात. तर काही शेतकरी उष्णता वाढल्यानंतर काळ्या कसदार जमिनीत लागवडीसंबंधी नियोजन करीत आहेत.

मजूरटंचाईचा फटका

सध्या कापूस वेचणीसह इतर कामांना मजूरटंचाईचा फटका बसत आहे. असाच फटका कलिंगड लागवडीसंबंधी शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. कलिंगड लागवडीसाठी ठिबक अंथरने, गादीवाफे व्यवस्थित करणे, मल्चींग पेपर टाकणे व दाबणे, कलिंगड लागवड यासाठी मजुरांची मोठी आवश्यकता असते. परंतु या कामासही मजूरटंचाईचा फटका बसत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची लागवड रखडत सुरू आहे. तसेच काहींना लागवडीसंबंधी प्रतीक्षा करावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT