Rabi Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Fardad Cotton : ‘फरदड’च्या क्षेत्रात रब्बी, फळ पिकांची लागवड सुरू

Rabi Crops : आजघडीला सुमारे दीड लाख हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पीक काढून त्यात रब्बी व इतर फळ पिकांच्या लागवडीची तयारी सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस दरांवर सतत दबाव आहे. तसेच दरांबाबबत अनेक अफवाही आहेत. पिकात गुलाबी बोंड अळीदेखील वाढली आहे. यामुळे खोडवा किंवा फरदड कापूस पीक शेतकऱ्यांनी काढण्यास या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुरवात केली. आजघडीला सुमारे दीड लाख हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पीक काढून त्यात रब्बी व इतर फळ पिकांच्या लागवडीची तयारी सुरू आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला दर ७१०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलवर होते. परंतु नोव्हेंबरच्या मध्यानंतर दर काहीसे कमी झाले. सध्या किंवा मागील पाच ते सात दिवसांपासून दरात फारशी वाढ नाही. तसेच दरवाढीची शक्यताही कुठे दिसत नाही.

कापूस पिकात नफा नसल्याने शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक काढायला या महिन्यातच सुरवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी दर चांगले मिळतील, यासाठी मका, गहू, बाजरी आदी पिके टाळून फरदड कापूस पीक तसेच ठेवले होते. परंतु दर हवे तसे नाहीत.

मागील हंगामात काही शेतकऱ्यांच्या फरदड कापसालादेखील दर मिळाले नव्हते. यंदाही बाजार अस्थिर आहे. शिवाय मजुरी वाढली आहे. सध्या २०० रुपये रोज, अशी मजुरी महिला सकाळी आठ ते तीन यादरम्यान कामासाठी घेत आहेत. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने वेचणीवर हवा तेवढा कापूस येत नाही. बोंडे व्यवस्थित उमलत नाहीत.

त्यात कचरा, किडीही येतात. यामुळे कापसाचा दर्जाही घसरतो. बाजारात तेजी नसल्याने फरदड कापूस घेण्यासंबंधी खरेदीदार उत्साह दाखवीत नाहीत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारण फरदड कापूस पिकाचे एकरी फक्त एक क्विंटल उत्पादन सद्यःस्थितीत शक्य आहे. त्याला वेचणी व इतर बाबींची मजुरी लक्षात घेऊन किमान चार हजार रुपये खर्च आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक घेणे टाळले. ज्यांच्याकडे पाणी आहे, त्या शेतकऱ्यांनी फळ पिकांसह, मका, गहू, बाजरीची पेरणी सुरू केली. यामुळे गहू पेरणी अद्याप सुरूच आहे. काही शेतकरी लवकर येणारी मका वाणलागवड कापसाखालील क्षेत्र रिकामे करून करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT