Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : साखर कारखान्यांकडून गळीत हंगामाला वेग; ऊस उत्पादकांना दिलासा

Sugarcane Season : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४४ लाख ३४ हजार ५१६ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ३७ लाख ९१ हजार ८९९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ८.५५ टक्के एवढा आहे.

विधानसभेच्या निवडणुकीमुळे चालू वर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उशिराने सुरू झाला आहे. १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली असली तरी हळहळू साखर कारखाने सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे.

यंदा जिल्हयात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. त्यातच विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. शासनाने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्यागतीने सुरू झाला आहे.

चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. मात्र, ऊस शेतात जुलैपासून पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. यंदा गाळपासाठी सुमारे एक लाखाच्या आसपास ऊस उपलब्ध आहे.

बारामती ॲग्रोची गाळपात आघाडी

जिल्ह्यात जवळपास १६ साखर कारखाने असून गाळपासाठी सर्वच कारखाने पुढाकार घेतली अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये सहकारी ९ आणि खासगी ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख १७ हजार टन एवढी आहे. आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने ८ लाख ८४ हजार २०१ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ६ लाख ४१ हजार २० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ७.१६ टक्के एवढा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT