Fertilizer Selling Center Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Selling Center : कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

Monsoon Update : जून महिन्याच्या मध्यावधीपासून पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. सध्या मान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यामध्ये आली आहेत.

Team Agrowon

Palghar Agriculture News : जून महिन्याच्या मध्यावधीपासून पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. सध्या मान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यामध्ये आली आहेत. तालुक्यातील शेतकरी भात पेरणीसाठी बी-बियाणे खरेदीच्या कामाला लागला आहे.

विक्रमगड, डहाणू तालुक्यातील बळीराजा खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. सध्या कृषी सेवा केंद्रावर खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

विक्रमगड तालुक्यातील साधारणपणे ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर भातशेती करण्यात येते. जून मध्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यामुळे बळीराजा शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करत आहे. आता शेतकरी खरीप हंगामासाठी खरेदीच्या तयारीला लागला आहे. या हंगामात विक्रमगड, डहाणू तालुक्यात भात, नागली आणि भाजीपाला अशी पिके घेतली जातात.

भाजीपाला पिके कमी कालावधीत शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारी पिके आहेत. भात पीक हे शेतकऱ्यांचे वर्षभराचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.

पहिला पाऊस पडला की शेतकरी भात पीक पेरणी करतात, तर भाजीपाल्यामध्ये मेथी, कोंथिबीर, दोडके, घोसाळे, मिरची, काकडी अशी भाजीपाला पिके घेतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT