Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे एक लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Crop Damage : राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अंदाजे एक लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्रावरील शेतीमालाचे नुकसान झाले आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अंदाजे एक लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्रावरील शेतीमालाचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष, कलिंगड, केळी या फळपिकांसह टोमॅटो व भाजीपाला पिकाची मोठी हानी झाली आहे. मात्र, या पावसाचा रब्बी हंगामाला दिलासा मिळणार आहे.

कृषी व महसूल विभागाकडे येत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलडाण्यात ३२ हजार हेक्टर तर नाशिकला ३० हजार हेक्टरवरील शेतमालाची हानी झाल्याचा अंदाज आहे. अहमदनगर भागातील १५ हजार हेक्टर तर नंदुरबार, धुळे, जळगाव भागातदेखील पिकांची हानी झालेली आहे.

नाशिक भागात द्राक्ष बागांची मोठी हानी झालेली आहे. बुलडाणा पट्ट्यात कलिंगड तर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे या या पट्ट्यात टोमॅटोसह भाजीपाला पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे. जळगाव भागात केळींच्या बागांमध्ये पाने फाटल्यामुळे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

राज्याच्या काही भागात रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस पाऊस झाला आहे. मात्र, दोन्ही दिवशी सुट्टीमुळे सरकारी कार्यालये बंद असल्यामुळे कोणत्याही जिल्ह्यातून नुकसानविषयक अहवाल सोमवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत राज्य शासनाला प्राप्त झालेले नव्हते. ‘‘नाशिक, बुलडाणा, अहमदनगर भागात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये जोरदार वृष्टी झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण ३० ते ६० मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झालेली आहे. परंतु, सुट्टीमुळे पंचनामे झालेले नाहीत. पंचनाम्याची कामे आजपासून सुरू होतील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पावसाच्या एकूण आकडेवारीनुसार, जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत राज्यात एकूण सरासरी १०७५ मिलिमीटर पाऊस होतो. परंतु, यंदा ९२८ मिलिमीटरपर्यंतच म्हणजे ८६ टक्क्यांच्या आसपास सरासरी पाऊस झालेला होता. त्यामुळे रब्बीसाठी नोव्हेंबरमध्ये पावसाची अपेक्षा होती. नोव्हेंबरमध्ये एरवी राज्यात एकूण सरासरी १८ मिलिमीटरपर्यंत पाऊस होतो. यंदा रविवारी राज्यभर सरासरी ८ मिलिमीटर तर सोमवारी २० मिलिमीटरपर्यंत पाऊस झालेला आहे.

काही पिकांना पाऊस ठरणार उपयुक्त

बुलडाणा, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्येही काही भागात धुव्वाधार पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांमध्ये सोमवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत ३० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली होती. तसेच, अमरावती १४ तर यवतमाळ जिल्ह्यात २७ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला.

‘‘राज्यात काही जिल्ह्यांत केवळ भाताची पिके उभी आहेत. याशिवाय तुरीची कापणी झालेली नाही. ओंबीतील पक्व भाताचे पावसामुळे नुकसान शक्य आहे. परंतु, तुरीवर प्रतिकूल परिणामाची शक्यता नाही. याउलट गहू, हरभरा व ज्वारी या रब्बी पिकांसाठी गेल्या दोन दिवसांतील अवकाळी पाऊस उपयुक्त ठरू शकतो,’’ असे कृषी विभागातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT