Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage: मॉन्सूनपूर्व पावसामुळे १९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Sangli Crop Survey: सांगली जिल्ह्यात मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे ११७ गावांतील १९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधिक झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले आहेत.

Team Agrowon

Sangali News: सांगली जिल्ह्यात मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे ११७ गावांतील १९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधिक झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाने सांगितले.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा यांसह इतर तालुक्यातील अनेक गावांत संततधार, मुसळधार पाऊस झाला. यामुळे उन्हाळी पिकांसह मका, फळ, जिरायती, बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. मे महिन्यात कृषी सहायकांनी आंदोलन केले होते.

त्यामुळे पंचनामे थांबले होते. त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून जिल्ह्यातील बाधिक झालेल्या पिकांचे पंचनामेही सुरु केले आहेत. शिराळा तालुक्यात २२ गावांतील २६४ शेतकऱ्यांचे ४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्याचा अहवाल तयार करुन वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.

एप्रिलमध्येही नुकसान

जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, विटा, आणि जत तालुक्यात एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. अवेळी झाल्येल्या पावसामुळे ५४ गावांतील ३९२ शेतकऱ्यांचे २३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पावसामुळे ९९६ शेतकऱ्यांचे ४२७ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. मार्च मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात एप्रिलमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाने बाधित झालेल्या पावसामुळे पिकाचे पंचनामे सुरू असून लवकरच पूर्ण होतील.
विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT