Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे खानदेशात पिकांना फटका

Agriculture Weather Update : खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही वाढ झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही वाढ झाली आहे. विषम वातावरणाचा रब्बी, वेलवर्गीय व फळ पिकांनाही फटका बसत आहे.

यंदा हुडहुडी भरविणारी थंडी मागील आठवड्यात काही दिवस होती. या आठवड्यात ढगाळ वातावरणाची समस्या वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे.

धुळ्यात किमान तापमान मागील आठवड्यात सहा ते सात अंश सेल्सिअस दरम्यान होते. जळगावातही किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. परंतु ढगाळ वातावरणाने किमान तापमानात वाढ झाली आहे.

यंदा नोव्हेंबरमध्ये तीन दिवस किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत होते. डिसेंबरमध्येही सुमारे २६ दिवस ढगाळ व पावसाळी वातावरण होते. यामुळे रब्बी पिकांच्या वाढीला फटका बसला आहे. दादर ज्वारी, संकरित ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. विषम वातावरणामुळे वेलवर्गीय पिकांसह मका, केळी पिकात फवारणी घेऊन बुरशीजन्य व अन्य कीटकांची समस्या दूर करावी लागत आहे.

यात खर्च व अतिरिक्त श्रम लागत आहेत. तसेच उत्पादनावरही परिणाम होत आहे. थंडीमुळे केळी पिकात करपा रोगाची समस्या आली होती. मध्येच ढगाळ वातावरण तयार झाल्याने बुरशीजन्य रोगही केळीत फोफावू लागले आहेत. यामुळे खते, पाण्यासंबंधीचे काटेकोर नियोजन शेतकऱ्यांना करावे लागत आहे. मध्येच ढगाळ वातावरण तयार होत आहे.

हिवाळा जाणवलाच नाही

यंदा हिवाळा अधिक दिवस जाणवलाच नाही. हुडहुडी भरविणारी थंडी पडलीच नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. थंडी अधिक राहिल्यास ज्वारी, मका आदी पिकांचे सिंचन अधिकचे करावे लागत नाही. किमान एक पाण्याची पाळी वाचते. परंतु यंदा थंडी नसल्याने पीकवाढीवर जसा परिणाम झाला. तशी पाण्याची गरजही वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Ban: उत्तर प्रदेशात बासमती तांदळावर परिणाम करणाऱ्या ११ कीटकनाशकांवर बंदी

Kharif Crop : नवापूरमधील संततधारेने पिकांना जीवदान

Jalgaon Rainfall : जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६२ टक्के पाऊस

Crop Damage Survey : अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; सोयाबीन किंमतीत वाढ, हरभरा स्थिर, शेवगा आवक वाढली, केळीचे दर कायम

SCROLL FOR NEXT