Yavatmal News : जिल्हा हा वनसंपदेने नटलेला आहे. मानव व वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहोचत आहे. वन्यप्राण्यांकडून वर्षाला सरासरी ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी केली जात असल्याचे वनविभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. याशिवाय पशुधन, मानवी हानीदेखील होते. जंगलालगत असलेल्या शेतात शेतकऱ्यांना रात्र जागून पिकांचे संरक्षण करावे लागत आहे.
जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे. मानवावर हल्ला करून जखमी केले जाते. पशुधनाची हानी होत आहे. अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आपला मोर्चा जंगलालगत असलेल्या गावाकडे वळवितात. त्यामुळे मानव व वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगल नष्ट होत आहे. यातच वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होत आहे.
२०२१-२२ या वर्षात ३१ हजार ६४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यासाठी दहा कोटी १८ लाख ७३ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली, तर ६८६ पशुधनाची हानी झाली. त्यापोटी एक कोटी ६६ लाख ९३ हजारांची मदत देण्यात आली. १२७ मनुष्य जखमी झाले. त्यांना एक कोटी ३२ लाख ६६ हजार रुपये भरपाई दिली गेली.
पुसद विभागात तीन व पांढरकवडा विभागात दोन याप्रमाणे पाच जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना एकूण ७५ लाखांची मदत देण्यात आली. २०२२-२३ या वर्षात ३० हजार २४८ हेक्टरचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नऊ कोटी ३० लाख ५९ हजारांची मदत देण्यात आली.
५९२ पशुधनाची हानी झाल्याने एक कोटी ४२ लाख ९५ हजार रुपये मदत देण्यात आली. १३१ व्यक्ती जखमी झाल्याने ७३ लाख ५८ हजारांची मदत दिली गेली. यवतमाळ विभागात एक व पांढरकवडा विभागात असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा नातेवाइकांना ९० लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
शेतात वीजप्रवाह
वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी शेताच्या चोहोबाजूंनी तारांचे कुंपण करून त्यात जिवंत वीजप्रवाह सोडतात. त्यामुळे यात वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. शेतशिवारात येणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना नाहक जीव गमवावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजना राबविण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.