E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील पीकपेरा नोंदणी ६२ टक्क्यांवर थांबली

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा पेरा नोंदणी करावी, यासाठी ता. एक ऑगस्ट ते ता २३ सप्टेंबर या कालावधीत ई-पीक पाहणी मोहीम राबविण्यात आली. यात शेतकऱ्यांनी मोबाईल ऍपद्वारे पीक पेरा नोंदविण्यात आला. यानुसार जिल्ह्यात पाच लाख सहा हजार ४६६ हेक्टर क्षेत्रानुसार ६२.२५ टक्के पेरा नोंदविल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात एकूण शेती खाते नऊ लाख ८२ हजार २८१ आहेत. तर शेतीखात्याचे एकूण क्षेत्र १० लाख १७ हजार १८० हेक्टर आहे. तर खरिपाचे सर्वसाधारण संपूर्ण वर्ष पेरणी क्षेत्र आठ लाख १४ हजार ३६० हेक्टर आहे. खरिपामध्ये पेरणी केलेल्या पिकांचा पेरा नोंदविण्यासाठी महसूल विभागाकडून दरवर्षी ई-पीक पाहणी मोहित राबविण्यात येतो.

पेरणीनंतर दरवर्षी शेतकऱ्यांना त्यांच्यास्तरावरुन पीक पेरा नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. यासाठी शासनाने यंदा एक ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत पेरा नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले होते. या दरम्यान पेरा नोंदणी कमी झाल्यामुळे यास २३ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. या कालावधीत पाच लाख सहा हजार ४६६.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या पेर्‍याची नोंद झाली आहे.

प्रशासनाने खरीप हंगाम २०२४ साठी क्षेत्रीयस्तरावरुन पीक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा, माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे

या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील गुगल प्लेस्टोअर मधून ई-पीक पाहणी ऍप इंन्स्टॉल करत त्यात पीक पाहणी, पेरा नोंद नोंद घ्यावी, काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्या गावचे मंडळ अधिकारी, तलाठी, स्वस्त धान्यदुकानदार, कोतवाल, शेतकरी मित्र, प्रगतशील शेतकरी, आपले सरकार केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवकांनी ई-पीक पेरा पूर्ण करुन घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते.

तालुकानिहाय झालेली पीकपेरा नोंदणी (नोंदणी हेक्टरमध्ये, कंसात टक्केवारी)

नायगाव - ४८,२२९ (६७.५३), माहूर - ३४,७९७ (५४.६२), बिलोली - ४६,७७३ (७३.६२), किनवट - ८०,००४ (६४.७२), कंधार - ६७,२९५ (५३.२९), मुदखेड - २६,४४६ (६८.८५), हिमायतनगर - ३६,५२४ (७६.३९), अर्धापूर २८,४७३ (६४.७०), नांदेड - ३२,०६१ (५५.९७), देगलूर - ५०,०५२ (६९.६८), उमरी - ३४,८२५ (५९.९६), धर्माबाद - ३०,५३६ (६७.८५), लोहा - ७४,२७३ (५४.३१), हदगाव - ८९,८१६ (६३.४०), भोकर - ५१,५६५ (५४.७६), मुखेड - ७८,६८३ (५८.२२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : परभणी, हिंगोलीत २५ मंडलात सरासरीहून कमी पाऊस

Water Scarcity : वसई-विरारकरांची पाणी समस्या मिटणार

Paddy Disease : भातावर बगळ्या, तर नागलीवर करप्याचा प्रादुर्भाव

Dog Bite : श्वान दंश टाळण्यासाठी हात खाली ठेवा, जमिनीकडे पहा ः डॉ. भिकाने

Pm Kisan Installment : नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं ५ ऑक्टोबरला होणार वितरण

SCROLL FOR NEXT