E-Peek Pahani : वाळवा तालुक्यात ‘ई-पीकपाहणी’नोंदणी फक्त ७ टक्केच

Crop Registration : ‘माझी शेती माझा सातबारा’, ‘मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ हे ई-पीकपाहणी ॲप राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठीच केले आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Sangli News : इस्लामपूर, (जि. सांगली) ः वाळवा तालुक्यात केवळ ७ टक्केच खातेदारांनी ‘ई-पीकपाहणी ॲप’चा वापर केला आहे. तालुक्यातील एक लाख ६३ हजार २११ शेतकरी खातेदारांपैकी ११ हजार ४४५ खातेदारांनी या ॲपचा वापर केला आहे.

‘माझी शेती माझा सातबारा’, ‘मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ हे ई-पीकपाहणी ॲप राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठीच केले आहे. परंतु अजूनही बहुतांशी शेतकरी यापासून दोन हात लांब आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ई-पीकपाहणी ॲपवर नोंदणी करण्यासाठी जागृती करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

E Peek Pahani
E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या ॲन्ड्रॉईड मोबाइलमध्ये ॲपचा वापर करून शासनास आपल्या पीक पाण्याची माहिती द्यावी, या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आपला पीक पेरा अचूक नोंदविण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने हा प्रकल्प काही तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता.

त्यानंतर आता याच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील कृषी सहायक व तलाठी यांच्या माध्यमातून हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याची माहिती देण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.

...अशी होईल ‘ई-पीकपाहणी’

शेतकऱ्यांनी स्मार्टफोनचा वापर कारून ‘ई-पीकपाहणी’ हे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करावे. ॲपवर सातबारावरील नावाप्रमाणे नाव नमूद करावे लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व खाते क्रमांक दिसतील.

E Peek Pahani
E-Peek Pahani : आजपासून ई-पीक पाहणीसाठी विशेष मोहीम

या प्रक्रियेनंतर ओटीपी नंबर येईल. तो ॲपमध्ये टाकल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर शेतातील प्रत्येक पिकाचा फोटो ॲपमध्ये अपलोड करावे लागेल. त्यात शेतातील विहिरीचाही फोटो पाठवता येणार आहे. हे फोटो संबंधित तलाठ्याच्या लॉगीनमध्ये जातील. या अचूक पीकपेऱ्यामुळे पुढील हंगामात पीककर्ज मिळणे सोपे होईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई, पीकविमाही मिळणे सोपे जाणार आहे.

दृष्टिक्षेप

एकूण शेतकरी खातेदार १, ६३, २११

ई पीक नोंदणी केलेले खातेदार ११,४४६ (७ टक्के)

एकूण क्षेत्र (हेक्टर) ८३,८८१

ई-पीक नोंदणी झालेले क्षेत्र ८५३० (१०टक्के)

राज्य शासनाच्या या ई-पीकपाहणी ॲपमुळे चालू पिकाची, विहीर, कूपनलिका यांची अचूक नोंदणी होत आहे. तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. चांगला उपक्रम आहे. परंतु अजूनही शेतकरी खातेदारांमध्ये याबाबत जागरूकता झालेली नाही.
- जयसिंग मोरे, शेतकरी खातेदार, इस्लामपूर
सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ॲन्ड्रॉइड मोबाइलमध्ये ‘ई-पीकपाहणी’ ॲप व्हर्जन-२ डाउनलोड करावे. आपल्या स्वतःच्या शेतातील पिकाची पाहणी करून त्यामध्ये नोंद करावी. एका मोबाईल मध्ये ५० शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होऊ शकते. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यास ई-पीक नोंदणीसाठी मदत करावी. ई-पीक नोंदणीची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे.
- सचिन पाटील, तहसीलदार, वाळवा तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com