Metarhizium Fungus Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : मेटाऱ्हायझीअम बुरशींद्वारे पीक संरक्षण

Metarhizium Fungus : पिकांचे अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागील अनेक कारणांपैकी प्रमुख कारण कीटकांचा प्रादुर्भाव हे आहे. आकाराने लहान असल्या तरी या किडींची जीवनसाखळी लहान आणि प्रजनन क्षमता अधिक असल्याने त्यांची संख्या थोड्याच काळात प्रचंड वाढते.

Team Agrowon

डॉ. योगेश इंगळे

Agricultural Update : पिकांचे अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागील अनेक कारणांपैकी प्रमुख कारण कीटकांचा प्रादुर्भाव हे आहे. आकाराने लहान असल्या तरी या किडींची जीवनसाखळी लहान आणि प्रजनन क्षमता अधिक असल्याने त्यांची संख्या थोड्याच काळात प्रचंड वाढते. म्हणूनच नुकसानीचे प्रमाण वाढते. त्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांची एकापेक्षा एक विषारी फॉर्म्युलेशन्स बाजारात येत असली तरी स्वतःमध्ये आवश्यक ते अनुरूप बदल घडविण्याची क्षमता किडींमध्ये असल्याने त्यांचा प्रभाव थोड्याच काळात कमी झाल्याचे दिसून येतो.

या अतिविषारी कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे शेतीसाठी उपयोगी अशा अन्य मित्र कीटकांचा नाश झाल्याने नैसर्गिक नियंत्रण साखळी नष्ट होत आहे. अशा स्थितीमध्ये पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब केला पाहिजे. त्यात जैविक कीड नियंत्रण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.

आपल्याला बुरशी म्हटले की दरवेळी पिकांवरील विविध रोगच आठवतात. पण त्या निसर्गामध्ये विविध पर्यावरणपूरक कामे करत असतात. निसर्गातील काही बुरशी पिकांवरील विविध किडींमध्ये साथीचे रोग पसरवितात. निसर्गातून त्यांच्या विलगीकरणानंतर प्रयोगशाळेत निवडक माध्यमांवर वाढ केली जाते. त्यांच्या बुरशी तंतू, बिजाणूपासून जैविक कीडनाशके तयार केली जातात. या भागामध्ये मेटाऱ्हायझीअम अनिसोप्लाई या जैविक घटकाची ओळख करून घेऊ.

मेटाऱ्हायझीअम अनिसोप्लाई (Metarhizium anisopliae)

या बुरशीमुळे कीटकांमध्ये ‘ग्रीन मस्करडाईन’ हा साथीचा रोग होतो. ही बुरशी निसर्गतः जमिनीमध्ये आणि पिकांच्या मुळांजवळ आढळून येते. सदर बुरशी जवळपास २०० पेक्षा अधिक कीटक प्रवर्गातील निरनिराळ्या किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते. या बुरशीच्या संपर्कात कीटक आल्यानंतर बुरशीचे तंतू / बिजाणू त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. पेशीभित्तिकांचे नुकसान करून त्यांच्या शरीरामध्ये वाढू लागतात. अलैंगिक पद्धतीने बिजाणूंची संख्या वाढते. बऱ्याचदा या बुरशीच्या चयापचयातून विशिष्ट विषारी द्रव्ये तयार होतात. त्यामुळे कीड गतप्राण होतो. या मेलेल्या किडीच्या शरीरावर बिजाणूंची निर्मिती होऊन ते हवेद्वारे निसर्गात पसरत राहतात. कीड नियंत्रणाचे नैसर्गिक चक्र सुरू राहते. किडींच्या अळी, पिल्ले, व प्रौढ अवस्था या बुरशीच्या प्रादुर्भावास बळी पडतात.

किडी : भात, कडधान्य, बटाटा, टोमॅटो, वांगी या सारख्या पिकातील पाने गुंडाळणाऱ्या, पाने खाणाऱ्या, फळ पोखरणाऱ्या किडींच्या अळी आणि या पिकात येणाऱ्या हुमणी, बोंडअळी, तपकिरी भुंगेरे यांच्या व्यवस्थापनासाठी या बुरशीचा वापर होतो.

वापर : फवारणीसाठी ४ ते ५ ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे मेटाऱ्हायझिमचा वापर करावा. टोमॅटो, बटाटा, वांही या पिकातील हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी ही बुरशी १ : १० या प्रमाणात कुजलेल्या शेणखतासोबत एकत्रित करून झाडाच्या मुळांजवळ हेक्टरी ६० किलो मिश्रण या प्रमाणात वापरावी. एक महिन्यानंतर पुन्हा या प्रक्रियेचा अवलंब करावा. (लेबल क्लेम.)

डॉ. योगेश इंगळे (वनस्पती रोगशास्त्रज्ञ), ९४२२७६६४३७

(सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hybrid Cow Nutrition: संकरित गाईंच्या आहाराने दूध उत्पादन वाढवा, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला

Wheat Cultivation : खपली गहू लागवड यंदाही कमीच राहणार

Maize Cultivation : मका मळणीवर; काही भागांत कापणी सुरू

Nira Devghar Water Project : काम सुरू करा, अन्यथा मंत्रालयात घुसू

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT