Parbhani News : यावर्षीच्या (२०२४) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात २ लाख ३२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे (डीसीएस) शुक्रवार (ता.१३) पर्यंत जिल्ह्यातील ५८ हजार १९८ हेक्टर क्षेत्राची पीक पाहणी करण्यात आली आहे अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाइल अॅपद्वारे पीक पाहणीस रविवार (ता. १)पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण पीक पाहणी करावयाच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची संख्या ७ लाख ४५ हजार ८०५ आहे.
त्यापैकी शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविलेल्या प्लॉटची संख्या ६० हजार २६ एवढी आहे. पीक पाहणी केलेल्या क्षेत्राची संख्या ५८ हजार १७३ हेक्टर आहे. त्यामध्ये २५.१८ हेक्टर चालू पड असून एकूण पीक पाहणी क्षेत्र ५८ हजार १९८ हेक्टर आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात आजवर २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख ३२ हजार २४२ हेक्टरवर (८५.७६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यातुलनेत डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाइल अॅपद्वारे पीक पाहणी क्षेत्र खूप मागे आहे.
परभणी जिल्हा डीसीएस पीक पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका पीकपाहणी प्लॉट संख्या पीकपाहणी नोंद प्लॉट पीकपाहणी क्षेत्र
परभणी १३३९४८ १४०२५ १४२१५
जिंतूर ११९६११ १४३१८ १४९१६
सेलू ७९५६२ ५२०८ ५४३७
मानवत ५१००७ ३७९५ ४५०२
पाथरी ५४७५३ १५८० १८३०
सोनपेठ ४४०३२ १६५४ १६५४
गंगाखेड १०५४२० ३९७८ ३२७३
पालम ७०६१० ७९८२ ५८६१
पूर्णा ८६८६२ ७४८६ ६५०६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.