Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : विदर्भात दोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : विदर्भाच्या काही जिल्ह्यात बुधवारी (ता.२९) पावसाचा जोर ओसरला असला तरी या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात सुमारे दोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भाच्या काही जिल्ह्यात बुधवारी (ता.२९) पावसाचा जोर ओसरला असला तरी या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात सुमारे दोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावती व नागपूर विभागात कृषी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाअंती ही आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाचा कपाशी, तूर तसेच रब्बी पिकांना फटका बसला. धुक्‍याचा प्रादुर्भाव असल्याने तुरीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. बुधवारी (ता.२९) गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात २०.१ मिमि, अमरावती १०.६, ब्रम्हपूरी २३.६,चंद्रपूर ५, गोंदिया २२.४, नागपूर १३.४, वर्धा ४०, यवतमाळ ६ मिमि याप्रमाणे पावसाची नोंद करण्यात आली.

विदर्भात सर्वाधिक १ लाख २६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान यवतमाळमध्ये नोंदविण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात नुकसानच नसल्याचे अहवाल सांगतो. पूर्व विदर्भातील धानपट्टयात चंद्रपूर सर्वाधिक प्रभावीत ठरले आहे. या जिल्ह्यात १३ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील एकूण नुकसान १८ हजार हेक्‍टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. प्रशासनाच्या सूचनेनंतर कृषी विभागाकडून प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले त्या आधारे विदर्भातील प्रभावित जिल्ह्यांमध्ये दोन लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसा अहवाल देखील प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

नुकसानीचे सर्वेक्षण करण्यामध्ये बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांनी आघाडी घेतली होती. वर्धा, यवतमाळ, गोंदिया हे जिल्हे सर्वेक्षणामध्ये माघारले होते. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त अहवालानुसार, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख २६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्हानिहाय प्राप्त नुकसानीचे अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. ...

असे आहे नुकसान

अकोला ४ हजार ६०९

यवतमाळ १ लाख २६ हजार ४३७

अमरावती निरंक

बुलडाणा ३५ हजार ९६२

वाशीम ४६२

चंद्रपूर १३ हजार

नागपूर २ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT