Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : पाण्याअभावी साताऱ्यात पिकांची होरपळ

Water Problem In Satara : मॉन्सूनच्या पावसाने यंदा दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टंचाई भासणाऱ्या गावातील विहिरींचा, बोअरची, जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे.

हेमंत पवार

Karad Water News : मॉन्सूनच्या पावसाने यंदा दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टंचाई भासणाऱ्या गावातील विहिरींचा, बोअरची, जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, सातारा जिल्ह्यातील २८ गावे, ८२ वाड्या तहानलेल्या आहेत.

तेथील सुमारे ३० हजार ५४३ आबालवृद्धांना प्रशासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पिकांच्या पाण्याची कोणतीच तरतूद नसल्याने टंचाईग्रस्त गावातील शेती पिकांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिके वाळून चालली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होते. मात्र भौगोलिक रचनेमुळे पश्‍चिमेकडे मुसळधार पाऊस सुरू असताना पूर्वेकडील तालुक्यात मात्र अपेक्षित पावसाची प्रतीक्षाच असते. त्यामुळे ज्या भागात पाऊसमान चांगले आहे, त्या परिसरात प्रामुख्याने उसाचे पीक घेतले जाते.

तर अन्य ठिकाणी शेतकरी कोरवाडवाहू पिके घेतात. दरवर्षी उन्हाळ्यात वळवाचा मोठा पाऊस जिल्ह्यातील विविध भागांत होतो. यंदा मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही.

त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टंचाई भासणाऱ्या गावातील जलस्रोतांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. पिकांच्या पाण्याची कोणतीच तरतूद नसल्याने टंचाईग्रस्त गावातील शेती पिकांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. संबंधित गावातील विहिरींची, बोअरची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पिकांच्या पाण्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे.

२४ विहिरी १९ बोअरचे अधिग्रह

ज्या गावात पाण्याच्या अन्य स्रोतांची उपलब्धता आहे, त्या गावातील विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड तालुक्यातील सहा विहिरी, दोन बोअर, पाटण तालुक्यातील एक विहीर, वाई तालुक्यातील पाच विहिरी, कोरेगाव तालुक्यातील दोन विहिरी, माण तालुक्यातील तीन विहिरी, चार बोअर, खटाव तालुक्यातील एक विहीर, १३ बोअर, महाबळेश्‍वर तालुक्यातील सहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

२८ गावे, ८२ वाड्या तहानलेल्या

सातारा जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे संबंधित गावे-वाड्या वस्त्यांवरील लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

त्यामध्ये माण तालुक्यातील १२ गावे आणि ७४ वाड्या, खटाव तालुक्यातील एक गाव, वाई तालुक्यातील दोन गावे, दोन वाड्या, पाटण तालुक्यातील एक वाडी, जावली तालुक्यातील दोन गावे एक वाडी, महाबळेश्‍वर तालुक्यातील पाच गावे आणि एक वाडी, सातारा तालुक्यातील एक गाव आणि तीन वाड्या, कऱ्हाड तालुक्यातील पाच गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

त्या गावांना आणि वाड्यांना २२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT