घनसावंगी : तालुक्यातील शेतशिवारात रानडुकरांनी (Randukar) धुडगूस घातला आहे. रब्बी हंगामातील (Rabbi Season) ज्वारी, (Jwari) हरभरा (Gram) व उसाच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान करण्यात येत आहे . त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, नुकसान झालेल्या पिकांची (Crop Loss) भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
घनसावंगी तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात सध्या पाण्याचे स्रोत तुडूंब भरलेले आहेत. त्यातच अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत.
खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी व परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही.
शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू या पिकाबरोबर उसाचे पीक घेत आहेत. मात्र वन्यप्राणी, तसेच खाण्याच्या शोधात फिरत असलेली रानडुकरे शेतात घुसत आहेत.
तेथे शेतातील पिके जमीनदोस्त करून मोठे नुकसान करीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना या पिकातून काही हाती लागण्याची शक्यता कमी आहे. रानडुकरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभी असलेली पिके जमीनदोस्त होत आहेत.
रानडुकरामुळे शेतातील गहू , हरभरा व ज्वारीचे पिकांचे नुकसान होत आहे. वन्यप्राणी ही पिके भुईसपाट करीत आहे यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पिकावर झालेल्या खर्चाइतकेही उत्पन्न मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.बाबासाहेब तेलगड, शेतकरी, राजेगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.