Unseasonal Rain agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ३२१ हेक्टर क्षेत्र बाधित

Unseasonal Rain : वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला.

माणिक रासवे

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. ९) ते शुक्रवारी (ता. १२) या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे परभणी जिल्ह्यातील २४.५१ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २९७ हेक्टर मिळून एकूण ३२१.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी (ता. ९) ते शुक्रवारी (ता. १२) या कालावधीत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट झाली. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे बाधित परभणी जिल्ह्यातील गावांची संख्या ३४ आहे.

या पावसात जिल्ह्यातील २१ गावांतील ४१ शेतकऱ्यांचे एकूण २४.५१ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यात २.४० हेक्टरवरील बागायती पिके व २२.११ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील मोठी ७ व लहान १ अशी एकूण ८ दुधाळ जनावरे व २ बैल दगावले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र २९७ हेक्टर असून त्यात २७३ हेक्टरवरील बागायती पिके व २४ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.

हिंगोली तालुक्यात गारपिटीमुळे एकाचा मृत्यू झाला. नुकसानीच्या पंचनाम्यानंतर अंतिम बाधित क्षेत्र निश्चित होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीची मागणी केली जाईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

SCROLL FOR NEXT