Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा चार जिल्ह्यांना फटका

Crop Damage : अवकाळी पावसाने विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले.

Team Agrowon

Nagpur News : अवकाळी पावसाने विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे चारही जिल्ह्यांत ज्वारी, मका, तीळ, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले. पांढरवकडा येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर अमरावतीसह काही जिल्ह्यात घरावरील टिनपत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले.

अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छाच पुरविला आहे. रविवारी (ता. २८) सायंकाळीदेखील पुन्हा एका अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भात सर्वदूर नुकसान झाले. त्याच्या परिणामी प्रशासनाकडून सर्व्हेक्षण व पंचनामे करीत तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरकवडा (जि. यवतमाळ) तालुक्‍यातील अकोली खुर्द येथील यादवराव बापूराव शास्त्रकार हे सायंकाळच्या सुमारास शेतात पुंजाणे गोळा करण्याचे काम करीत होते. याचवेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. आष्टी शहीद (जि. वर्धा) तालुक्‍यातील बांबर्डा परिसरात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली.

नामदेव चंदीवाले, शेवंता भलावी, गजानन घटी, श्रीराम धुर्वे, गजानन मडावी, पंजाब मडावी, वंदना चंदीवाले यांचे टिनपत्रे उडाल्याने नुकसान झाले. तीन विद्युत खांब कोसळल्याने महावितरणलाही फटका बसला. तीन व्यक्‍तींसह अनेक जनावरेदेखील या घटनेत जखमी झाली. कारंजा घाडगे (जि. वर्धा) तालुक्‍यातही अवकाळीने कहर केला. पारडी, बोटोणा, एकांबा, सारवाडी परिसरात मोठे नुकसान झाले.

पारडी येथील मंगेश कवारे यांच्या शेतातील गोठ्यावर असलेले शेड उडून गेले. त्यामुळे गोठ्यात साठवून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या कांद्याचेही नुकसान झाले. नामदेव मुंगभाते, प्रवीण तामटकर यांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने त्यांचेही नुकसान झाले.

एकांबा येथील शेतकरी ईश्‍वर हिंगवे यांनाही लाखो रुपयांचा फटका बसला. त्यांच्या पॅक हाऊसवरील टिनपत्रे उडून गेले. मनोहर काकपुरे यांच्या गोठ्यावर असलेली टिनपत्रे उडून आतील गाईंच्या अंगावर पडले. त्यामुळे गोठ्यातील गाई जखमी झाल्या.

चांदूररेल्वे (जि. अमरावती) तालुक्‍यालाही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा दणका बसला. झिबला येथील रखसाना युसूफ शहा, राहूल रामदास केवट यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. खरबी मांडवगड येथील अंकुश संतोष सोनबावणे यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. परिणामी घरातील धान्य व इतर साहित्य भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी येरड येथील सरपंच प्रशांत देशमुख, पोलिस पाटील प्रतिभा देशमुख यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दर दबावातच; शेवगा दर तेजीतच, केळीची आवक टिकून, बाजरी दबावातच तर लिंबाचे दर स्थिर

Farmers Protest: कर्जमाफीपासून रस्ते-दुरुस्तीपर्यंत दहा मागण्या; उमरीत ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Farmers Relief: आतापर्यंत १९० कोटींचे अनुदान वितरित

Rabi Season: महाबीज’कडून ७५ हजार क्विंटल रब्बी बियाणे पुरवठा

DY Patil Agri University: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गुप्ता

SCROLL FOR NEXT