Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान

Crop Damage : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) सायंकाळी अवकाळी पाऊस, वादळ तसेच काही ठिकाणी गारपीट झाली.

Team Agrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) सायंकाळी अवकाळी पाऊस, वादळ तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस, तर तेल्हारा, अकोट, पातूर, बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यांना वादळाचा फटका बसला. जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ज्वारीची लागवड झाली असून, हे पीक जमीनदोस्त झाले. बाळापूर तालुक्यात लिंबू बागांमध्ये नुकसान झाले.

शिवाय गहू, ज्वारी, कांदा, तीळ पिकांचेही नुकसान झाले. बाळापूर तालुक्यात सोंगणीला आलेल्या ज्वारी, कांदा आणि गहू पिकांचे अतोनात झाले. निंबा, उरळ, हाता, अंदुरा, टाकळी, मोरगाव (सादीजन) या भागांना पावसाने झोडपले.

वाडेगाव परिसरात लिंबू बागांना वादळी वाऱ्याने नुकसान पोहोचवले. सध्याचा बहर गळाला. तेल्हारा तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. माळेगाव बाजार परिसरात वीज पडल्याने नऊ मेंढ्यांचा मृत्यू झाला.

वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात काही गावांत जोरदार पाऊस झाला. मंगरुळपीरमधील हिरंगी, शेलुबाजार, सोयता नागी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सायखेडा येथे गारपीट झाली.

भुईमूग, कांदा, भाजीपाला, संत्रा या पिकांची मोठी हानी झाली. रिसोड तालुक्यातील खडकी (सदार), करडा, तांदळवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. खडकी (सदार) येथील शेतकरी शंकर सदार यांचा बियाण्याचा कांदा जमीनदोस्त झाला.

बुलडाणा जिल्ह्यात ३४७५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक २८०० हेक्टर नुकसान खामगाव तालुक्यात झाले आहे. यात मका, ज्वारी, गहू, भुईमूग, कांदा व फळपिकांचा समावेश आहे.

याशिवाय मोताळा ११९, मलकापूर १७८, नांदुरा २५९, मेहकर येथे ११७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. खामगाव तालुक्यात गणेशपूर, लोखंडा, वझर, शिराळा परिसरात गारपीट झाली.

काळेगाव शिवारात कांदा बीजोत्पादन घेतले जाते. गारपिटीमुळे या पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसला. मागील मदत अजून मिळाली नसल्‍याने आताची मदत कधी मिळेल, असा प्रश्‍न आहे.
- ज्ञानेश्‍वर रहाणे, शेतकरी, काळेगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyeban Crop Damage : सोयाबीन ‘पाण्यात’

Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

Crop Damage Compensation : एक महिना होऊनही मिळेना मदत

Maratha Reservation: मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप

Water Storage : उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT