Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसामुळे भाजीपाला पिके, फळबागांचे नुकसान

Unseasonal Rain : ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान होऊ लागले आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान होऊ लागले आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांवरही परिणाम होत आहे. यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. या पावसामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात विविध भागांत दोन दिवसांपासून भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, कांदा या पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. तसेच फळांमध्ये द्राक्षे, आंबा, डाळिंब, अंजीर अशा पिकांनाही चांगलाच फटका बसणार आहे.

रब्बी हंगामात जिल्ह्यात सरासरी दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ४९ हजार ४३ हेक्टर म्हणजेच ६५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र सततच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- पावसामुळे सुरू असलेल्या निर्यातक्षम द्राक्षाची तोडणी ठप्प

- सुमारे १५० रुपये प्रतिकिलोने विक्री होणाऱ्या द्राक्षाचे दर ७० रुपये प्रति किलोपर्यंत खाली

- कलमी आंब्यांना नुकताच आलेला मोहर भिजला, बुरशीची वाढ होण्याची भीती

- अंजीर उत्पादक हवालदिल, ढगाळ हवामानामुळे फळे उकलून गोडी कमी

- पावसाच्या हलक्या सरीमुळे खट्टा बहार संकटात

पाण्याचे योग्य नियोजन करून मीठा बहार कसाबसा जगविला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वर्षभर जीव लावून जोपासलेले अंजीर पीक मातीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळ जमत नाही.
- नीलेश झेंडे, अंजीर उत्पादक, दिवे.
चालू वर्षी पाऊस कमी असल्याने भागात कांदा लागवडी झाल्या आहेत. त्यातच आता पाऊस सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. रोग, किडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन घटेल.
- संदीप घोले, कांदा उत्पादक, यवत, ता. दौंड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT