Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Pre-Monsoon : मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने गुरुवारी (ता. १६) जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

एकनाथ पवार

Sindhudurg News : मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने गुरुवारी (ता. १६) जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा तडाखा बसला असून, या गावातील १०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, जिल्ह्यात १५० हून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी एक वाजल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांतील काही गावांमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून विजांचा कडकडाट आणि वादळीवारा सुरू झाला.

डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे दाणादाण उडाली. या गावातील १०० हून अधिक घरांची पडझड झाली. याशिवाय कळसुली, खारेपाटण गावांमध्ये देखील जोरदार पाऊस आणि वादळ झाले.

वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे, अरुळे यांसह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. करूळला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. या गावात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था पाहायला मिळाली. शेतमळे पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होते. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार देखील झाले.

भुईबावडा, मांगवली, उंबर्डे या परिसरात देखील पावसाचा जोर अधिक होता. मांगवली गावांमध्ये सहा ते सात घरांची वादळामुळे पडझड झाली असून, मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याला वादळीवाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. यामध्ये घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे काजूची शेकडो झाडे उन्मळून पडली. आखवणे भोम पूनर्वसन गावठणातील शेकडो काजूची झाडे उन्मळून पडली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

Agrowon Diwali Article: मध्यस्थांना फाटा, शेतकऱ्यांना वाटा

MSP Registration: हमीभाव खरेदी नोंदणी मोफत; पैसे मागणाऱ्या संस्थांवर कारवाईचे निर्देश

Agrowon Diwali Article: ग्रामीण भागातील तरुणांची घुसमट

SCROLL FOR NEXT