Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पपई, केळीच्या बागा वादळामुळे भुईसपाट

Rain Update : शुक्रवारी वादळामुळे हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपूर, नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.

Team Agrowon

Akola News : तेल्हारा तालुक्यात शुक्रवारी (ता.१०) आलेल्या वादळ व पावसामुळे पपई, केळीच्या बागांमध्ये मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शुक्रवारी वादळामुळे हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपूर, नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यात शेकडो एकरांवरील पपई व केळीच्या लदबदलेल्या फळबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याचे चित्र विविध गावांमध्ये आहे.

हे संकट केवळ अवकाळी पावसाच्या स्वरूपात न येता प्रचंड वारा, उधाण, मेघगर्जना, विजांचा कडकडाट स्वरूपात होते. वादळाची तीव्रता इतकी होती की रस्त्यावर मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांची पडझड झाली आणि घरांवरील टीनपत्रे उडून गेली.

त्यामुळे लहान मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळ, भाजीपाला व विविध पिकांचे नुकसान झाले आहे. केळीची झाडे शेतात कोलमडून पडली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी प्रदीप पाटील व इतर शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.

शेतकऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी शासनाने योग्य मदत करावी.
- सचिन कोरडे पाटील, राज्य समन्वयक, केळी उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : पाणी हेच शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण

Rain Crop Loss : मराठवाड्यातील ३३ मंडलांत अतिवृष्टी

Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडलांत अतिवृष्टी

Krushi Samrudhhi Yojana : कृषी समृद्धीमधील कामांचे त्रयस्थ मूल्यमापन होणार

Sunflower Cultivation : बारामतीत सुर्यफूलाकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

SCROLL FOR NEXT