Crop Cluster Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Cluster Farming : वेगवेगळ्या पिकाचे स्वंतत्र क्लस्टर करून मार्गदर्शन करू

Group Farming : जालना जिल्ह्यातील ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आयोजिण्यात येणारे एप्रिल महिन्यातील नियमित मासिक चर्चासत्र बुधवारी (ता. ९) बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे उत्साहात पार पडले.

Team Agrowon

Jalna News : शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळे क्लस्टर करून जिल्ह्यातील सर्व पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे पूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येईल, असे आत्माचे उपप्रकल्प संचालक अमोल आगवान यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आयोजिण्यात येणारे एप्रिल महिन्यातील नियमित मासिक चर्चासत्र बुधवारी (ता. ९) बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे उत्साहात पार पडले.

वरुडी येथील शेतीनिष्ठ शेतकरी जयकिसन शिंदे हे विकतच्या पाण्यावर उत्कृष्टरीत्या जोपासत असलेल्या डाळिंब बागेत शिवारफेरी घेऊन तेथेच चर्चासत्राला सुरवात करण्यात आली.

यावेळी आत्मा जालन्याचे उपप्रकल्प संचालक श्री. आगवान यांच्यासह बदनापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, उद्यानविद्या विषय विशेषज्ज्ञ डॉ. दीपक कच्छवे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. डॉ. सोमवंशी यांनी पीएम प्रणाम योजना विषयी माहिती दिली.

डॉ. कच्छवे यांनी उन्हाळ्यात फळबागेत कमीत कमी रसायनाचा वापर, पाणी बचत, मल्चिंग, तुषारचा वापर, सरी वरंबा आड पाणी आदींची शिफारस केली.

ॲग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे कैलास सुदेवाड, दहिगावचे नंदकिशोर देशमुख, माळी टाकळीचे गणेश बुरकूल, वडगाव वखारीचे रामप्रसाद खैरे, सपकाळ जळगावचे दिलीप सपकाळ, कल्याणी करजगांवचे संतोष बोरसे, बाजार गेवराईचे कृष्णा कान्हेरे, वाकूळणीचे सोमनाथ अवघड, बाजार वाहेगावचे बळिराम काळे, शेख जाकीर पटेल, वरुडीचे जयकिसन शिंदे, बाबासाहेब शिंदे, रमेश शिंदे, भास्कर शिंदे, काकासाहेब काकडे यांनी अनुभव सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: रब्बीतील पेरण्यांना महिनाभर उशीर

Registration of Farmers: हमीभावाने कापूस विक्रीसाठी पाच लाख शेतकऱ्यांची नोंदणी

Cyclone Montha: ‘मोंथा’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याला धडकणार

Rain Forecast: विदर्भात वाढणार पावसाचा जोर

Ativrushti Anudan : शेतकऱ्याने तहसीलदाराच्या गाडीच्या फोडल्या काचा; अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्याने शेतकरी संतप्त

SCROLL FOR NEXT