Agriculture Fund Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Fund : दुष्काळ निधी अपहारप्रकरणी १३ जणांवर ‘फौजदारी’

Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेकडून तासगाव, जत, आटपाडीत गुन्हे दाखल

Team Agrowon

Sangli News : जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये पडून राहिलेल्या दुष्काळ निधीतील एक कोटी २० लाख रुपयांच्या अपहर प्रकरणी १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोमवारी (ता. २४) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

तासगाव तालुक्यातील ९, आटपाडी, जत आणि पलूस शहर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या तेरा कर्मचाऱ्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले असून त्यांच्याकडून ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

अपहारप्रकरणी दोषी असलेल्या प्रमोद कुंभार, योगेश वजरीनकर, मारुती हिले, संजय पाटील (सर्व तासगाव शाखा), अविनाश पाटील अविनाश सूर्यवंशी, सुरेश कोळी (सिद्धेवाडी शाखा), विजय यादव (निमणी शाखा), बाळासो सावंत (पोलिस शाखा), इंग्रजीत वाघमारे (बसरगी शाखा), मच्छिंद्र म्हारुगडे, प्रदीप पवार, दिगंबर शिंदे (सर्व नेलकरंजी शाखा) यांचा समावेश आहे. तपास अधिकारी हबीब कुलकर्णी यांनी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही. अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे.

या रकमेचा अपहार करून ती काढल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. त्यानंतर सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय निमणी, हातनूर येथील शाखेतही असे प्रकार आढळल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तपासणीमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांचा अपहार निश्चित झाला असून त्यापैकी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही कर्मचारी संचालकांच्या जवळचे आहेत. अपहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर ते दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी या संबंधित संचालकांचा दबाव झुगारत कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली.

त्यानुसार अगोदर निलंबन करून आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेतर्फे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन तर चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी सर्वाधिक १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT