Sugarcane Workers agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांचा डेटा बेस तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखान्यांना सूचना

Sugarcane Season : ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा झाली. यासाठी शासनाकडून ग्रामसेवकांऐवजी बाह्य संस्थेची नेमणूक केल्याचे परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Season : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस तोडणी कामगारांचा डेटा बेस तयार करावा. हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होताच त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल (ता.२०) शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक बैठकीत अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, ऊस तोडणी कामगार संघटनेचे नेते प्रा. सुभाष जाधव उपस्थित होते.

यावेळी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा झाली. यासाठी शासनाकडून ग्रामसेवकांऐवजी बाह्य संस्थेची नेमणूक केल्याचे परिपत्रकाद्वारे कळविले आहे. परंतु, अद्याप संबंधित संस्थेची निवड झाली नाही. ती प्रक्रिया झाल्यानंतर ओळखपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त साळे यांनी सांगितले. इतर विषयांवर चर्चा करताना जिल्हाधिकारी येडगे यांनी कामगारांना सुविधा देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागांना व कारखान्यांना दिल्या.

कारखानास्तरावर पथक नेमून त्यांनी माहिती घेण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी मदत करावी. शाळा कामाच्या ठिकाणापासून खूप दूर असतील, तर मुलांना जवळील शाळेत पोहोच करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी, प्रत्येक साखर कारखान्याने जास्त संख्या असलेल्या भागात अंगणवाडी दूर असेल तर लहान मुलांसाठी बालसंस्कार गृह स्थापन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दसऱ्यानंतरच पाऊस ओसरणार

India-Russia Relation : भारत-अमेरिकेसाठी ‘तो’ निकष अयोग्य

Banana Market : हिंगोली जिल्ह्यात केळीचे दर गडगडले

Baramati Cleanliness : बारामती, लोणावळा, चाकण शहरे इंदूरच्याधर्तीवर स्वच्छ करणार

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT