Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Cotton Cultivation : यंदाही देशात गेल्या वर्षीप्रमाणे १२४ लाख, तर महाराष्ट्रात ४२.३४ लाख हेक्‍टर क्षेत्र राहील, असा अंदाज संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी वर्तविला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कापसाच्या दराने यंदा उभारीच घेतली नाही. परिणामी, यंदा कापसाचे क्षेत्र कमी होईल, अशी स्थिती निर्माण झाली असताना इतर पिकांचा पर्यायच नसल्याने क्षेत्र घटेल होईल, अशी शक्‍यता नसल्याचा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून करण्यात आला आहे. यंदाही देशात गेल्या वर्षीप्रमाणे १२४ लाख, तर महाराष्ट्रात ४२.३४ लाख हेक्‍टर क्षेत्र राहील, असा अंदाज संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी वर्तविला आहे.

जागतिकस्तरावर लागवड क्षेत्र सरासरी १३० लाख हेक्‍टर असतानाही उत्पादकतेच्या बाबतीत मात्र भारत पिछाडीवर आहे. त्यामुळेच दर दबावात असण्याच्या काळात उत्पादकता देखील कमी असल्याने उत्पन्नात वाढ होत नाही, अशी स्थिती आहे. उत्पादकता वाढीच्या प्रयत्नाअंतर्गत देशात सघन व अतीसघन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे.

त्या माध्यमातून पहिल्याचवर्षी पारंपरिक उत्पादकतेच्या तुलनेत २२ ते ५६ टक्‍के वाढ नोंदविण्यात आल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. २०२३-२४ या खरीप हंगामात कापसाचे दर दबावात राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य आहे. सुरुवातीला ७००० रुपयांचा दर होता त्यानंतर आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हे दर ७४०० रुपयांवर पोहोचले.

त्यापूर्वीच्या वर्षात कापसाला १२ हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला होता. आता मात्र दर दबावात असल्याने कापसाखालील लागवड क्षेत्र कमी होईल, असे अपेक्षा आहे. परंतु ही शक्‍यता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून फेटाळण्यात आली आहे.

कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांसमोर पर्यायच नसल्याने त्यांच्याकडून याच पिकावर भर दिला जातो. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील १२४ लाख हेक्‍टर क्षेत्र देशात तर महाराष्ट्रात ४२.३४ लाख हेक्‍टर कापसाची लागवड राहील, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

असे होते २०२३-२४ या वर्षातील क्षेत्र (लाख हेक्‍टर)

भारत ः १२४.६९

महाराष्ट्र ४२.३४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT