Cotton Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Shortage: तेलंगणात कापूस बियाणे टंचाईच; कापूस लागवड वाढणार

Seed Supply Crisis: तेलंगणा राज्यात यंदा कापूस लागवड वाढण्याचा अंदाज आहे. कापूस बियाण्याची मागणीही वाढून १ कोटी ७ लाख पाकीटांवर पोचण्याचा अंदाज. मात्र वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी बियाण्याचा साठा नाही.

Anil Jadhao 

Pune News: तेलंगणा राज्यात यंदा कापूस लागवड वाढण्याचा अंदाज आहे. कापूस बियाण्याची मागणीही वाढून १ कोटी ७ लाख पाकीटांवर पोचण्याचा अंदाज. मात्र वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी बियाण्याचा साठा नाही. मागणीच्या केवळ निम्म्या बियाण्याचा पुरवठा असल्याचे उद्योगांचा दावा आहे. त्यामुळे बोगस बियाण्याचा शिरकाव बाजारात होऊ शकतो, अशी भीती बियाणे उद्योगाने व्यक्त केली.

तेलंगणात कापूस हे पारंपरिक पीक आहे. तेलंगणात पेरणीयोग्य क्षेत्रावर तब्बल ४० टक्के कापूस पीक होते. मात्र मध्यंतरी कमी भाव, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवली होती. मात्र मागील तीन हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर दिसला. चालू हंगामातही हमीभावाने तेलंगणात सर्वाधिक खरेदी झाली होती. त्यामुळे तेलंगणातील शेतकरी पुन्हा कापसाकडे वळत आहेत. कडधान्य, मका, सोयाबीन आणि हळद उत्पादक आता कापूस पिकाकडे वळले आहेत.

तेलंगणात २०२४ च्या हंगामात १८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. तर यंदा २० लाख ५० हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे कापूस बियाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कापूस लागवडीसाठी १ कोटी ७ लाख बियाणे पाकीटांची आवश्यता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत १५ टक्के साठा ठेवणे गरजेचे आहे, असे तेलंगणा कृषी विभागाचे म्हणणे आहे.

तेलंगणातील एकूण बियाणे उपलब्धतेचा विचार केला तर एकूण मागणीच्या केवळ अर्धाच पुरवठा आहे. त्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर पुरेशे बियाणे मिळेल की नाही, याबाबत शंका असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की २ कोटी ४० लाख कापूस बियाणे पाकीटे उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे. पण लाॅजिस्टीकच्या अडचणी आणि बाजारात पुरवठा करण्यातील अडचणी लक्षात घेता मोठा आव्हान असणार आहे.

बोगस बियाणे येण्याची भीती

शेतकऱ्यांची कापूस बियाण्याला मागणी वाढणार आहे. पण त्यातुलनेत पुरठा कमी आहे. पेरणी सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसीठा झुंबड उडणार आहे. पण मुळातच पुरवठा कमी असल्याने काही असमाजिक घटक शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणेही मारू शकतात. यासाठी तेलंगणा कृषी विभागाने धोरण आखण्याची गरज आहे, असे बियाणे उद्योगांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT