Cotton Seed Rate : कापूस बियाणे दरात वाढ

Cotton Cultivation : देशात बीटीमधील बोलगार्ड २ प्रकारच्या कापूस बियाण्याची सर्वाधिक लागवड केली जाते. तर तुलनेत बोलगार्ड १ प्रकारच्या बियाण्यांची लागवड अल्प असते.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२५-२६ या हंगामासाठी बीटी (बॅसिलस थुरिंजेंसिस) मधील बोलगार्ड २ प्रकारच्या कापूस बियाणे दरात यंदाही वाढ केली आहे. ही दरवाढ देशभरात लागू राहणार असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. दुसरीकडे बीटी कापूस बियाणे तंत्रज्ञानातील सुधारित वाण किंवा आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम आहे. याबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे.

देशात बीटीमधील बोलगार्ड २ प्रकारच्या कापूस बियाण्याची सर्वाधिक लागवड केली जाते. तर तुलनेत बोलगार्ड १ प्रकारच्या बियाण्यांची लागवड अल्प असते. कापूस पीक तोट्याचे ठरत आहे. त्यातील तोटा वाढत असल्याने लागवड सतत कमी होत आहे. यंदा कापसाला कवडीमोल दर मिळाले. हमीभाव फारशा शेतकऱ्यांना कापसासंबंधी मिळाला नाही.

Cotton Seed
Cotton Farming Award: उच्चांकी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान; ‘राष्ट्रऋषी नानाजी देशमुख पुरस्कार’ प्रदान!

मजुरी, खते यातील दरवाढ, बियाण्याच्या काळाबाजार या समस्यांना तोंड देऊन शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली होती. परंतु पिकाने शेतकऱ्यांचा हिरमोड केला. यातच दर्जेदार, किडी, गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक्षम कापूस वाण यावा, अशी अपेक्षा, प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु नवा, दर्जेदार कापूस वाण यंदाही शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी स्थिती असून, बीटी कापूस बियाण्याची दरवाढ मात्र झाली आहे.

यामुळे कापूस उत्पादक पट्ट्यात नाराजी आहे. दुसरीकडे शासन किंवा सरकार बियाणे दरवाढ करते, बियाणे दर निश्‍चित करते, पण याच दरात त्याची विक्री होते का, बियाण्यांचा काळाबाजार, जादा दरात विक्री यासंबंधी कोणतेही नियंत्रण आणले जात नाही, शेतकऱ्यांची मोठी वित्तीय पिळवणूक होते, या स्थितीत कृषी यंत्रणा, खते बियाणे विक्रेते मूग गिळून गप्प असतात, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Cotton Seed
Cotton Production : देशात कापूस उत्पादनात ६० लाख गाठींची तूट ; डॉ. वाय. जी. प्रसाद ः सुधारित बियाण्यांसह व्यापक उपायांची गरज

...अशी झाली कापूस बियाणे दरवाढ

२०२३-२४ च्या हंगामात बीटी (बोलगार्ड २) कापूस बियाण्याचे दर ८५३ रुपये प्रति पाकिट, असे होते. २०२४-२५ मध्ये पुन्हा दरवाढ झाली. या वर्षासाठी बियाणे दर ८६४ रुपये प्रति पाकिट, असे होते. तर यंदा म्हणजेच २०२५-२६ च्या हंगामासाठी बीटी (बोलगार्ड २) कापूस बियाण्यांचे दर ९०१ रुपये प्रतिपाकिट, असे आहेत. तर बोलगार्ड १ प्रकारातील कापूस बियाण्याचे दर यंदाच्या हंगामासाठी ६३५ रुपये प्रतिपाकिट, असे असणार आहेत.

महाराष्ट्रात कापूस लागवड सर्वाधिक असायची किंवा अजूनही कापूस पीक तुलनेत अधिकाधिक क्षेत्रात दिसते. परंतु हे पीक फक्त बियाणे, कीडनाशके, तणनाशके उत्पादक, पुरवठादार यांचे खिसे भरणारे बनले आहे. कापूस बियाण्यातील जनुकीय सुधारणांचा कार्यक्रम दिसत नाही. रोगप्रतिकारक्षम, गुलाबी बोंड अळीला रोखणारा कापूस वाण यंदा येईल, अशी अपेक्षा होती. परंतु असा कुठलाही निर्णय झालेला दिसत नाही. दुसरीकडे कापूस बियाणे दरात मात्र दरवर्षी वाढ केली जात आहे.
- रमेश पाटील, कापूस उत्पादक, शहादा, जि. नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com