Cotton procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurment : कापसाच्या आवकेसह दरातही चांगली वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा

Cotton Market Rate : दिवाळीनंतर कापूस तसेच सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. कापसाचे दर हमीभावापेक्षा जास्त गेले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : दरवाढीच्या अपेक्षेने आजवर साठवून ठेवलेले कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. दिवाळीनंतर कापूस तसेच सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. कापसाचे दर हमीभावापेक्षा जास्त गेले आहेत. दुसरीकडे सोयाबीनच्या दरातही तेजी आल्याने सोयाबीनची आवक वाढली आहे.

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन आणि कापूस दरात सातत्याने चढ़-उतार राहिले आहेत. सद्यःस्थितीत कापसाला सर्वच बाजारात ७ हजार १५५ रुपयांवर भाव मिळत आहे. जिल्ह्यातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या यवतमाळच्या बाजारात ७ हजार ३०५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाला दर मिळत आहे. सध्या रब्बी हंगामात पैशांची आवश्यकता भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी पांढरे सोने आणि सोयाबीन विक्री करीत आहेत.

जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. आता हळूहळू कापसाची आवकही वाढू लागली आहे. दोन्ही पिकांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली होती. आता सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे. सध्या सोयाबीनचे दर पाच हजार दहा रुपये ते पाच हजार ३०५ रुपयांवर गेले आहेत.

लांब स्टेपलच्या कापसाला ७ हजारांवर दर

सोयाबीननंतर कापसाच्या दरातही सुधारणा होत आहे. लांब स्टेपलच्या कापसाला ७ हजार २० तर मध्यम स्टेपलच्या कापसाला ६ हजार ६२० रुपये हमीभाव आहे. त्या तुलनेत कापसाला चांगला दर मिळत आहे. सध्या बोरी अरब बाजार समितीत सात हजार १५५ रुपये दर मिळत आहे. कापूस खरेदीच्या सुरवातीलाच चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming: एकात्मिक दुग्धव्यवसायातून पशूसखी होताहेत सक्षम

Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा

Weekly Weather: राज्यात सौम्य थंडीची शक्यता

Farmer Loan Waiver: द्राक्ष उत्पादकांची संपूर्ण कर्जमाफी करा

Crop Insurance Issue: बटाट्याचे क्षेत्र वाढूनही पीकविम्यात समावेश नाही

SCROLL FOR NEXT