Cotton procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र शेंदुर्णीत सुरू

Cotton Market Update : खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू झाली असून, भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) पहिलेच खरेदी केंद्र शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे सुरू करण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू झाली असून, भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) पहिलेच खरेदी केंद्र शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे सुरू करण्यात आले आहे. खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

बाजारात कापसाचे दर दबावात आहेत. हमीभाव खेडा खरेदीत मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे या खरेदी केंद्रात कापूस विक्रीचा शेतकऱ्यांचा ओघ अधिक आहे. शेंदुर्णीत गोपाला जीनिंगमध्ये खरेदी केंद्र सुरू झाले असून, कापसाला प्रतिक्विंटल सात हजार २० रुपये दर देण्यात आला.

मंगळवारी (ता. २८) खरेदीचा पहिला दिवस होता. बुधवारीदेखील (ता. २९) कापूस विक्रीसंबंधी आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. बहुलखेडा येथील शेतकरी अंकुश लक्ष्मण पवार यांच्या कापसाने भरलेल्या ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली. ‘सीसीआय’चे प्रभारी अधिकारी गजानन पिसे यांनी पवार यांना रुमाल, टोपी घालून कापूस खरेदीस प्रारंभ केला.

या वेळी पाचोरा येथील प्रभारी अधिकारी योगेश थारनेरकर, बोदवड येथील प्रभारी अधिकारी प्रवीण पाटील, गोविंद अग्रवाल, कडोबा माळी, नामदेव बारी, नीलेश थोरात, शंकर बारी, पंकज सूर्यवंशी, मनोज अग्रवाल, नितीन अग्रवाल, सुनील अग्रवाल, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.

कापूस खरेदीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा वेळ वाचेल, तसेच आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक असावा आणि बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. कापूस विक्रीनंतर तीन दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rainfall 2025: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज; विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे

Sugarcane Farming : ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

Pasha Patel: शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे; पाशा पटेल यांचा अजब सल्ला

Dairy Farming : दुग्ध व प्रक्रिया व्यवसायातून शोधला आनंद

SCROLL FOR NEXT