Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop Damage : कापूस पिकाची वाताहत

Unseasonal Rain : गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.

Team Agrowon

Buldana News : गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. मजुरीचे दर गगनाला भिडलेले असून, कापसाच्या भावात घसरण झाली. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्यामुळे तो मेटाकुटीस आला आहे.

पावसामुळे कापूस भिजला व त्याची पत अतिशय खराब झाली आहे. या कापसाची केवळ चार हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापारी खेडा खरेदी करीत आहेत. वेचणीची मजुरी तीनशे ते साडेतीनशे रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

नांदुरा तालुका दर्जेदार कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेतून ही ओळख पुसत चालली. या वर्षी तर या पिकाने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. सुरुवातीला पेरणीच्या वेळेस बियाणे न उगवल्याने नुकसान झाले. त्यात दोन वेळेस अतिवृष्टी व बोंड लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळी व आता वेचणीच्या काळात पाऊस झाल्याने फटका बसला.

कोरडवाहू पिकाचे बेहाल

ठिबक सिंचनावर आधारित कपाशी बुरशीजन्य रोगांसोबतच बियाणे सदोषामुळे खराब झाल्या. कोरडवाहू पीक त्या वेळेस बऱ्यापैकी होते. मात्र शेवटच्या एका पावसाने या कपाशीची तारांबळ उडविली. आता कुठे त्यांचे दोन -चार बोंडे फुटली होती. पण तीसुद्धा या पावसाने खराब केली. कोरडवाहू कपाशी यंदा उत्पादन कमी व खर्च जास्त अशी झाली.

मी अल्पभूधारक शेतकरी असून या वर्षी कपाशीची पेरणी केली होती. पहिल्या वेचणीत थोडा कापूस आला. दुसरी वेचणी करायची होती. पण पाऊस झाल्याने फुटलेल्या कापसाची दाणादाण झाली. आज रोजी ही वेचणी सुरू असताना आठ मजुरांनी ३०० रुपये प्रमाणे केवळ दिवसभरात ६८ किलो कापूस वेचला. काल हा कापूस २ हजार ७२० रुपयांना विकला. त्‍यातून मजुरीचे २ हजार ४०० रुपये द्यावे लागले. वाहतुकीचे ऑटो भाडे २०० रुपये दिल्यानंतर मला केवळ १२० रुपये शिल्लक राहिले.
- महादेव सूर्यधन, शेतकरी, टाकरखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT