Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Sowing Decline : मोताळ्यात शेतकऱ्यांचा कल मका, तूर, सोयाबीनकडे

Cotton Seed : तालुक्यात कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली असून परिणामी कृषी केंद्र चालकांवर कपाशीचे बियाणे शिल्लक दिसून येत आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यात कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली असून परिणामी कृषी केंद्र चालकांवर कपाशीचे बियाणे शिल्लक दिसून येत आहे. यावर्षी ५० टक्क्यांवर पाकिटे परत करण्याची वेळ आली आहे. आजवरची ही सर्वांत मोठी बियाणे परतफेड मानली जात आहे.

तालुक्याची ‘कॉटन बेल्ट’ही ओळखही बदलत चालली आहे. शेतकरी यंदा मका, तूर, सोयाबीनकडे वळाले आहेत. शेतकऱ्यांच्या मते, कपाशीचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत असून खर्च मात्र वाढत आहे.

वेळेवर पीक कर्ज न मिळणे, बाजारात दराचे अस्थिर चित्र, दीर्घकालीन पीक असल्याने रब्बी हंगामावर परिणाम आणि बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव यांसारख्या अडचणींमुळे कपाशी पिकाकडे पाठ फिरवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

तालुक्यातील अनेक कृषी केंद्र चालकांनी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीचे बियाणे मागवले होते. मात्र मागणीअभावी बियाणे पडून आहे. ते परत पाठवावे लागणार आहे. यावर्षी बीटी कपाशीच्या एका पाकिटाची किंमत सुमारे ८५० रुपये आहे.

बदलते पीक निवडीचे चित्र

या खरीप हंगामात शेतकरी मका, तूर व सोयाबीन यांसारख्या पिकांकडे वळाले आहेत. कमी कालावधीतील पीक, मजूर उपलब्धतेची मर्यादा आणि तुलनेने कमी खर्च या कारणांमुळे हे पर्यायी पीक अधिक लोकप्रिय ठरले आहे. याशिवाय तालुक्यात ४०० ते ५०० एकर शेतीवर सोलर प्रकल्प उभे राहिल्यामुळे कपाशी क्षेत्र आणखी घटले आहे.

तालुक्यात कपाशीच्या पेऱ्यात तब्बल ७० ते ७५ टक्के घट झाली असून बियाण्याची मोठ्या प्रमाणात परतफेड करावी लागत आहे, असे कृषी व्यावसायिक चेतन खर्चे यांनी सांगितले. मागील वर्षीच्या तोट्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशी न निवडता इतर पर्याय स्वीकारले आहेत, असे कौतुकराव जुनारे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT