Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Industrial Electricity : औद्योगिक वीज जोडणीचा खर्च ‘महावितरण’ करणार

Mahavitaran : शेती वगळता कोणत्याही नवीन वीज जोडणीसाठी आता ग्राहकाने खर्च करण्याची गरज नाही.

Team Agrowon

Baramati News : ‘‘शेती वगळता कोणत्याही नवीन वीज जोडणीसाठी आता ग्राहकाने खर्च करण्याची गरज नाही. यापुढे वीज जोडणीचा सर्व खर्च महावितरण स्वतः करणार आहे. ग्राहकांनी फक्त कोटेशनची रक्कम भरावी,’’ असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

बारामती, केडगाव व सासवड विभागांतील सर्व औद्योगिक ग्राहकांना गतिमान वीज सेवा देण्यासाठी बारामती येथील ऊर्जा भवन येथे ‘महावितरण’ने ‘स्वागत कक्ष’ स्थापन केला आहे. सुनील पावडे व बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‍घाटन करण्यात आले.

अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंते म्हसू मिसाळ व संजय सोनवलकर, उद्योजकांतर्फे संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनिल अवचट, खजिनदार ॲड. ए. एल. शेख आदी उपस्थित होते.

श्री. पावडे म्हणाले, ‘‘औद्योगिक ग्राहकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात. तसेच त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, याकरिता हा ‘स्वागत कक्ष’ काम करेल. नवीन जोडणीची माहिती असो किंवा नावात बदल, भार बदल, वीजबिलाची तक्रार प्रत्येक बाबतीत हा कक्ष ग्राहकांना मदत करेल.

उद्योजकांनी swagatcell_baramati@mahadiscom.in या ई-मेलवर किंवा ७८७५७६८०२७ व ७८७५७६८०५० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यास महावितरण स्वत:हून ग्राहकांना फोन करून अथवा जागेवर भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी मदत करेल.

काम होण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ याची माहिती सुरुवातीलाच दिली जाईल. काम पूर्ण झाल्यावर ग्राहकाचा अभिप्राय घेतला जाईल. अधिकाधिक उद्योजकांनी या नवीन सेवेचा फायदा घ्यावा.’’

कटफळ, मुडाळे येथे नवीन वीज उपकेंद्र ः

कटफळ येथे ‘महावितरण’चे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र होईल. यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या ‘एमआयडीसी’ला व परिसरातील उद्योजकांना अखंडित वीजपुरवठा मिळेल. पणदरे येथील औद्योगिक वसाहतीला सध्या ज्या उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो त्या वाहिनीचे अंतर मोठे आहे. त्यामुळे वीजपुरठा खंडित झाल्यास त्याचे निराकरण करण्यास वेळ लागतो. त्याकरिता मुडाळे येथे २२० केव्हीचे अति उच्चदाब वीज उपकेंद्र होईल. हे उपकेंद्र झाल्यास पणदरे उपकेंद्राच्या समस्या निकाली निघतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT