Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Project Scam: ‘शक्तिपीठ प्रकल्पा’त ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार; राजू शेट्टींचा आरोप

Raju Shetti: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात तब्बल ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. हा प्रकल्प रद्द झाल्याची लोकसभा काळात घोषणा झाली होती, पण तो केवळ स्थगित झाल्याचे मंत्रिमंडळाच्या मंजुरीतून स्पष्ट झाले आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे, या भ्रष्टाचारातले खरकटे आपल्याही मिशीला लागावे, यासाठी समर्थन देणाऱ्या नेत्यांचा आटापिटा सुरू आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकारांशी बोलताना केली.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली. मात्र तो रद्द नाही, तर स्थगित केला होता, हे मंत्रिमंडळाने नुकत्याच दिलेल्या मंजुरीवरून स्पष्ट झाले. वास्तविक, राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर असताना, कर्ज काढून ‘शक्तिपीठ’साठी अट्टहास का?

श्री. शेट्टी गुरुवारी (ता. २६) सोलापुरात आले होते. ते म्हणाले, की या प्रकल्पासाठी सरकारचे वित्त विभागच म्हणते, २० हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे. तसेच त्याचे दायित्व सरकारला घ्यावे लागणार आहे. सहसा साडेपाच टक्के दराने कर्ज घेतले जाते. पण राज्याची स्थिती सध्या कर्ज घेण्यासारखी नाही. शिवाय हे कर्ज हुडकोकडून ८.८५ टक्के दराने काढले जाणार आहे.

हा बोजा कशासाठी, राज्याची क्षमता संपली आहे, अचानक आपत्ती आली, तर काहीच करता येणार नाही. शक्तिपीठ करणे ही काही आपत्तीची गोष्ट आहे का, केलेच पाहिजे असे आहे का, मग एवढा अट्टहास का, माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे, त्यांनीच कधीतरी एकदा पुस्तक लिहिले होते, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा, मला वाटतं, त्यांनी आता हे पुस्तक पुन्हा वाचावे, ते आर्थिक शिस्तीत कसे बसते, ते अत्यंत हुशार, अभ्यासू फडणवीस यांनी समजावून सागावे, असेही ते म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांत पोलिस-प्रशासनाची दडपशाही सुरू आहे. शेतकरी जिवावर उदार होऊन लढत आहेत.

‘शेतकऱ्यांना गंडविण्याचे काम सुरू, गप्प बसणार नाही’

‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तरीही ते ‘शक्तिपीठ’चा डीपीआर दाखवायला तयार नाहीत. त्यात गोपनीय ठेवण्यासारखे काय आहे. आम्ही तो डीपीआर पाकिस्तानला देतोय का, शक्तिपीठ महामार्गाच्या कार्यवाहीबाबत सूचना नाही, असे एकीकडे सांगता आणि प्रत्यक्षात जमिनीची मोजणी सुरू आहे. शेतकऱ्यांना गंडविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या कार्यवाहीला आमचे पूर्णपणे असहकार्य असेल. शेतकऱ्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाहीत, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी धाराशीव येथे बोलताना प्रशासनाला दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT