Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’चा अट्टहास कशासाठी?

Maharashtra Development Issue: चांगल्या सुपीक जमिनी, फळबागा शक्तिपीठ महामार्गामध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाणार आहे. मूठभर कंत्राटदारांसाठी मूलभूत समस्या, पायाभूत सुविधांचा विकास सोडून शेतकऱ्यांना ‘अशक्त’ करणारा महामार्ग उभारणे कितपत योग्य आहे का ? याचा विचार करावा.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Shaktipeeth Highway Project Issue: शेतकरी आत्महत्यांचे आकडे जर वाचले तर दररोज सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आणि आत्महत्या सुद्धा अतिशय किरकोळ रकमेसाठी, म्हणजेच कुणाला शाळेला कपडे नसल्यामुळे मुलगा आत्महत्या करतो, तर कुठे संसार चालवायला पैसे नसल्याने पोटातल्या गर्भासहित स्त्री आपले जीवन संपवते. इतके बिकट जीवन शेतकऱ्यांचे झाले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, बकाल शहरीकरण हे मूलभूत प्रश्‍न राज्यापुढे असताना ‘शक्तिपीठ’च्या नावाखाली हजारो कोटींचा चुराडा करण्याचे उद्योग शासनाला का सुचताहेत?

शक्तिपीठचा खर्च किती?

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च अंदाजे ८६ हजार कोटी रुपये एवढा आहे. प्रतिकिलोमीटर खर्च काढला तर १०८ कोटी रुपये एवढा दर किलोमीटर साठी खर्च येणार आहे. हा खर्च समृद्धी महामार्गाच्या दीडपट जास्त आहे. राज्यात अनेक मूलभूत समस्या असताना एवढ्या मोठा पैसा खर्च करून कोणतेही भले होणार नाही.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांनी रोखले शक्तिपीठ महामार्गाचे सीमांकन

शक्तिपीठ महामार्गाखाली राज्यातील तब्बल २७ हजार ५०० एकर जमीन जाणार आहे. ४८ ठिकाणी मोठाले पूल उभारून, २८ रेल्वे फाटक, ३० डोंगर कापून व ३८६ गावांतून हा महामार्ग जाणार आहे. कोकण आणि विदर्भाला जोडणारा नागपूर-रत्नागिरी महामार्ग सद्यःस्थितीत उत्तम आहे. ९४८ किलोमीटरचा हा रस्ता शक्तिपीठ महामार्गाच्या समांतरच आजही चांगल्या स्थितीत आहे. यावरून उत्तम वाहतूक होते. मग या रस्त्याचा उपयोग काय राहणार? सद्यःस्थितीत हा रस्ता असताना नवीन रस्ता उभारण्याचं काय प्रयोजन?

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Project: शक्तिपीठ महामार्ग : काही प्रश्‍न

हातात सत्ता आल्यामुळे राज्यकर्ते हे कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. चांगल्या सुपीक जमिनी, पश्‍चिम महाराष्ट्रातील फळबागा या महामार्गाखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची इतक्या दिवसांची मेहनत वाया जाणार आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने अनेक मोर्चे काढण्यात आले.

त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तरीसुद्धा शासन याची दखल घेत नाही, हे खेदाने नमूद करावे असे वाटते. मूठभर कंत्राटदारांच्या फायद्यासाठी, राज्यातील मूलभूत समस्या, पायाभूत सुविधांचा विकास सोडून शेतकऱ्यांना ‘अशक्त’ करणारा महामार्ग उभारणे कितपत योग्य?

ॲड. दत्ता श्रावणे म्हाळसापूर, ता. सेलू, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com