Ashadhi Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025: आषाढी वारीवर कोरोनाचे सावट: माळशिरस तालुक्यात २ संशयित रुग्ण आढळले

Covid Alert: पंढरपूरकडे जाणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात करोनाचे २ संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Sainath Jadhav

Pandharpur News: पंढरपूरकडे जाणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यात करोनाचे २ संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.तालुक्यातील अकलूज आणि माळीनगर येथे हे दोन नवे संशयित रुग्ण आढळले आहेत.या दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत अशी माहिती माळशिरसच्या वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली.

येत्या १८ जून रोजी संत तुकाराम महाराज, तर १९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.पंढरपूर वारीसाठी लाखो भाविक पायी दिंड्यांमध्ये सहभागी होतात.गर्दीमुळे संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेता,ही घटना चिंताजनक मानल्या जात आहेत.माळशिरस तालुक्यातील हि दोन्ही ठिकाणे वारकऱ्यांच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याने येथे करोनाचे रुग्ण आढळणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन या वर्षीची वारी सुरक्षित आणि आरोग्यदृष्ट्या निर्भय ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करत आहेत.मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, अशा उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

सद्यस्थिती पाहता देशात मागील आठवड्यात, 19 ते 26 मे दरम्यान, भारतात 1010 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले, तर महाराष्ट्रात 383 सक्रिय रुग्ण आहेत.यापैकी केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळून आले.त्यामुळे आषाढी वारीपूर्वी माळशिरस तालुक्यात आढळलेले करोनाचे संशयित रुग्ण प्रशासनासाठी इशारा असून,येणाऱ्या काळात वारीतील आरोग्य व्यवस्थापन अधिक काटेकोर होण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट

Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

SCROLL FOR NEXT