Sangli Coconut Auction agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Coconut Auction : कोथिंबिरीची जोडी १० हजार ५०० तर एक नारळ ६५ हजारांना, काय आहे हा विषय?

sandeep Shirguppe

Sangli Walava : वाळवा तालुक्यातील शिरगावात एका नारळाची किंमत ६५ हजार, तर कोथिंबिरीची जोडी १० हजार ५०० रुपयाची. मात्र ही किंमत या साहित्याची नाही, तर ग्रामदैवत सिद्धेश्वरांची भक्ती, प्रेमासाठी ग्रामस्थांनी स्वखुशीने दिलेली किंमत आहे. शिरगावात सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रतिवर्षी हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो. हरिनाम सप्ताहाचे हे ९७ वे वर्ष आहे, तर पारायण सोहळ्याचे ४१ वे वर्ष आहे.

हा पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताह नुकताच झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावातील स्त्री-पुरुष, अबालवृद्ध हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. सात दिवस ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन आदी विविध उपक्रम होतात. ज्ञानेश्वरी पारायणामध्ये तर संपूर्ण गाव सहभागी होते. पारायणाच्या शेवटच्या दिवशी पुरणपोळ्यांचा महाप्रसाद असतो.

केवळ शिरगावच नव्हे, तर वाळवा आणि नागठाणे पंचक्रोशीतील अनेक भक्तगण या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी व सिद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी यानिमित्ताने शिरगावमध्ये येतात. महाप्रसादाच्या दिवशी गावात कुठेही चूल पेटवली जात नाही. गावातील सर्व महिला महाप्रसादाच्या तयारीला लागतात. या दिवशी गावातील सर्व पशुपालक निघालेले सर्व १ हजार लिटर दूध महाप्रसादासाठी दान करतात.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही या साहित्यांचा लिलाव पार पडला. ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन खालील साहित्य खरेदी केले : मानाचा महाप्रसाद नारळ - संपतराव पाटील, (६५,०००), कोथिंबीर जुडी - गणेश पवार (१०५००), गहू - दीपक शिंदे (१०६००), तांदूळ - सुरेश आंबी- (५४०१), कणीक - राजाराम शिंदे - (५१००), हरभरा डाळ - दिनकर कणसे (१२०००), सौदा/मसाला - बजरंग यादव (५७००), सुटे नारळ - आनंदा शिंदे (४१००), चटणी - संपत पाटील (९६००), पडदे - उमेश माळी - (१८००), तेल डबे व रिकामे डबे - बापू सांभारे (८१००), गव्हाचा कोंडा - गजानन पाटील (२५००), भाजी - बाळासाहेब यादव (२०००), ज्वारी - मारुती आंबी (५१००), द्रोण पत्रावळी - आनंदा आंबी (३४००), येळण्या व शिबडी - भास्कर हवालदार (३५००), गूळ - बाळासाहेब पवार (५८००), कासरे / दोरी - अण्णा मचाले (३०००), वायर बल्ब - मारुती आंबी (२१००), दुधावरची साय - धोंडिराम आंबी (२१००), तूप - पांडुरंग पाटील (३२००), चहा पावडर - सुदर्शन आंबी (३६००), जळण - धनाजी पवार (५३००).

यावेळी अध्यक्ष गजानन पाटील, सचिव विलास पवार, राजाराम शिंदे, माजी सरपंच बजरंग आंबी, मुरलीधर वाले, माजी सरपंच बजरंग आंबी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संदीप पाटील, माजी उपसरपंच रघुनाथ पाटील, माजी उपसरपंच प्रकाश पवार, सिद्धेश्वर सोसायटी सदस्य संजय शिंदे, माजी पोलिस पाटील बाळासाहेब भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढाओढ

शिरगावमधील पारायण सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे पारायण सोहळा झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा अगदी द्रोण, पत्रावळी, पडदे, तेलाचे मोकळी डबे यांचा लिलाव करून विक्री केली जाते आणि हे साहित्य घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढाओढ दिसून येते. हे साहित्य खरेदी केल्यास आपल्याला सिद्धेश्वराचा आशीर्वाद मिळतो, अशी ग्रामस्थांची भावना आहे.

लिलावातून दीड लाखांवर रक्कम

यंदाच्या लिलावातून १ लाख ८० हजार रुपये सेवा मंडळाला मिळणार आहेत. यातून मिळालेल्या निधीचा वापर मंदिराच्या विकासासाठी केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT