Sangli Rain Update : सांगलीतील दुष्काळी पट्ट्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Rain News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अवघा ३३ मिलिमीटर म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये २२१ मिलिमीटर म्हणजे १९८ टक्के पाऊस झाला.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी भागासह कृष्णा आणि वारणा काठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अवघा ३३ मिलिमीटर म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये २२१ मिलिमीटर म्हणजे १९८ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये १५९ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला.

जिल्ह्यात गतवर्षी जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे खरिपाचा पेरा वाया गेला होता. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता.

गतवर्षी ऑगस्टमध्ये प्रत्येक मंडलात एक ते पाच दिवस पाऊस झाला. या दरम्यान, दोन ते दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. कमी पावसाचा फटका रब्बी हंगामालाही बसला होता. गतवर्षी शिराळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला होता.

Rain Update
Rain Update : सलग पाचव्या वर्षी ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

यंदा जूनपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेत सुरू केली. गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली. तर ऑगस्टमध्ये तिसऱ्या आठवड्यापर्यंत कमीअधिक पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यातील चरण मंडलात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली.

Rain Update
Heavy Rain : अतिपावसाचा खरीप पिकांना फटका

ऑगस्टमध्ये सरासरी २१ दिवस पाऊस झाला. प्रत्येक मंडलात पहिल्या आठवड्यात हलका तर दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. २४ ते २८ ऑगस्टपर्यंत या चार दिवसांत अतिवृष्टीही झाली. यंदा ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १८८ मिलिमीटरने पाऊस अधिक झाला.

तालुकानिहाय तुलनात्मक पाऊस दृष्टीक्षेप (मिलिमीटर)

तालुका ऑगस्ट २०२३ ऑगस्ट २०२४

मिरज २५.४ १८७.९

जत १२.९ १६५.६

खानापूर-विटा २२.४ १७३.८

वाळवा-इस्लामपूर ३०.२ २९९.७

तासगाव २९.६ २०१.९

शिराळा १३० ३९८.५

आटपाडी १५.६ १५९.६

कवठेमहांकाळ २०.४ २१०.९

पलूस २७.९ १८०.५

कडेगाव २५.३ १५९.९

एकूण ३३.३ २२१.३

महिना व पाऊस (मिलिमीटर)

जून २०३.५

जुलै २८३.६

ऑगस्ट २११.३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com