Agriculture Commissioner Mandhare Agrowon
ॲग्रो विशेष

Ai in Agriculture: ‘एआय’च्या प्रसारासाठी समन्वय गरजेचा : कृषी आयुक्त मांढरे

Agriculture Commissioner: डॉ. स्वामिनाथन यांच्या हरितक्रांतीमुळे मोठे बदल झाले आहेत. आता कृषी विभागाच्या माध्यमातून ‘एआय’ची संकल्पना पुढे येत आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत शेतीक्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : डॉ. स्वामिनाथन यांच्या हरितक्रांतीमुळे मोठे बदल झाले आहेत. आता कृषी विभागाच्या माध्यमातून ‘एआय’ची संकल्पना पुढे येत आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत शेतीक्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढणार आहे.

आपणा सर्वांना ते तंत्रज्ञान स्वीकारावे लागणार आहे. त्याचे फायदे व तोटे असतील, परंतु ते न पाहता शेती क्षेत्रात तंत्रज्ञान हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी यांचा समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, आवाहन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.

पुणे तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि पुणे कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाश्वत शेती दिनाचे आयोजन महाविद्यालयातील शिरनामे सभागृह येथे बुधवारी (ता. ७) केले होते. त्या वेळी कृषी आयुक्त श्री. मांढरे बोलत होते.

या वेळी माजी कुलगुरू वाय. एस. नेहरकर, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम. सी. खरकवाल, फलोत्पादन संचालक अंकुश माने, विस्तार संचालक रफिक नाईकवाडी, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, ‘आत्मा’चे संचालक सूरज मडके उपस्थित होते.

श्री. मांढरे म्हणाले, की शेतकऱ्यांना बांधावरच्या तंत्रज्ञानाची गरज आहे. ती जर आणली तर उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना जगात असलेल्या बाजारपेठेत आपला शेतमाल पोहोचवता येणार आहे. माजी कुलगुरू नेहरकर म्हणाले, की हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस स्वामिनाथन यांनी देशात जी हरितक्रांती घडवली गेली ती देशभर पोहोचली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buffalo Farming: म्हैसपालनात स्वच्छता, चारा, आरोग्यावर भर

De-Dollarization: डॉलरच्या दबदब्याची अस्ताकडे वाटचाल

Fertilizer Shortage: उशिरा आलेली जाग

Lumpy Skin Disease: सिंधुदुर्गाला ‘लम्पी’चा विळखा

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला मिळणार ‘लाडकी बहीण’चा हप्ता

SCROLL FOR NEXT