Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Management : पूरपरिस्थिती टाळण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय राखावा

Sangli Flood Management : यंदा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पुरामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी यंत्रणांनी आपापसांत समन्वय राखावा,’’ अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

Team Agrowon

Sangli News : ‘‘यंदा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पुरामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी यंत्रणांनी आपापसांत समन्वय राखावा,’’ अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील आदी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, ‘‘पूरपरिस्थितीत विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करा. त्यानुसार कामे होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे आदेश निर्गमित करावेत. पूर बाधित होणाऱ्या गावात जाऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी.

पूर परिस्थिती निर्माण झाल्यास, बाधितांचे स्थलांतर, जनावरांचे स्थलांतर, पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी या बाबींसंदर्भात संबंधितांना माहिती द्यावी. पाटबंधारे विभागाने पुरासंदर्भात नकाशे तयार केले आहेत."

"या नकाशांची माहिती पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील लोकांना समजावून सांगावी. लोकांचे स्थलांतर करावयाचे झाल्यास स्थलांतराच्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवाव्यात. निवारा केंद्रांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा. ’’

डुडी म्हणाले, ‘‘प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात एक जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यरत करावा. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्याबरोबरच कक्ष २४ तास कार्यान्वित राहील, याची दक्षता घ्यावी. एसटी महामंडळाने पुरामुळे बंद होणाऱ्या मार्गाची माहिती त्यांच्या बस वाहक व चालकांना द्यावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

Crop Loss: कापणीच्या मुहूर्तावर अस्मानी संकट

Jayakwadi Dam: जायकवाडीतून गोदापात्रातील विसर्गात घट 

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT