Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : सहकारमंत्री अतुल सावेंची तक्रार राष्ट्रीय पातळीवर करणार; शरद पवारांची सावेंवर नाराजी

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतुल सावे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Team Agrowon

Sharad Pawar : राज्यातील सहकारी संस्थांच्या नोंदीसाठी भाजप जिल्हाध्यक्षाच्या शिफारशीची अट घालण्याचा अजब निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

सहकार खात्याच्या या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पवार शनिवारी (ता.११) नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.

"राष्ट्रीय धोरणाला विसंगत असं धोरण राज्यात राबवलं जात आहे. सरकारचे प्रतिनिधी अशाप्रकारे काम करत आहे.

तसे निर्णयही सहकार मंत्र्यांनी घेतले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची मांडणी राष्ट्रीय साखर परिषदेत करू," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

सहकारी मंत्री अतुल सावे यांनी पवारांच्या टीकेला उत्तर दिले. सावे म्हणाले, शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते. तेव्हा ते कारखान्यांवर लावलेला कर माफ करू शकले नाही.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला.

तसा दिलासा पवार २५ वर्षे सत्तेत असूनही देऊ शकले नाहीत. म्हणून पवारांची नाराजी आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या नोंदीसाठी भाजप जिल्हाध्यक्षाच्या शिफारशीची अट घालण्याचा अजब निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

शुक्रवारी (ता.१०) सावे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना या निर्णयासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतुल सावे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील सहकार संस्थांची नोंदणी बंद करण्यात आली होती. ती सुरू करण्याची घोषणा सहकारमंत्री सावे यांनी केली.

तसेच सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी जिल्हा निबंधक आणि आयुक्ताची शिफारस आवश्यक असताना सावे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या शिफारशीचे पत्र आवश्यक असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश सहकार संस्थांवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT