Amit Shah 
ॲग्रो विशेष

Amit Shah : सेंद्रिय शेतमालाची जगभरात 'भारत ऑरगॅनिक्स' ब्रँडच्या नावाखाली होणार विक्री

Bharat Organics : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी नुकत्याच सुरू केलेल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) च्या 'भारत ऑरगॅनिक्स' ब्रँडचे प्रकाशन केले.

Swapnil Shinde

New Cooperative Body NCOL : सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी नुकत्याच लॉन्च केलेल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) च्या 'भारत ऑरगॅनिक्स' ब्रँडचे उद्घाटन केले. ते म्हणाले की हा भारत आणि परदेशातील सर्वात ‘विश्वासू ब्रँड म्हणून उदयास येईल. शाह यांनी NCOL चा लोगो, वेबसाईट आणि ब्रोशरही लाॅंच केले आहे. त्यांनी पाच सहकारी संस्थांना एनसीओएल सदस्यत्व प्रमाणपत्रेही दिली.

नवी दिल्लीमध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांना चालना देण्याच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित करताना शाह म्हणाले की एनसीओएल हे सेंद्रिय उत्पादकांसाठी एक व्यासपीठ आहे. आज आम्ही ‘भारत ऑरगॅनिक्स’ या ब्रँड अंतर्गत सहा उत्पादने प्रसिद्ध करत आहोत आणि अशी आणखी 20 उत्पादने डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जातील. ते म्हणाले की तूर डाळ, चना डाळ, साखर, राजमा, बासमती तांदूळ आणि सोना मसुरी तांदूळ ही सहा सेंद्रिय उत्पादने असतील. हे मदर डेअरीच्या सफल आउटलेट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विकले जातील.

अमित शाह म्हणाले की रिटेल आउटलेट्सचे नेटवर्क तयार केले जात आहे, NCOL सुरुवातीला भारतात सेंद्रिय उत्पादने विकेल आणि नंतर इतर देशांमध्ये विक्री करेल. एनसीओएलच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील सुमारे ५० टक्के हिस्सा थेट सभासद शेतकऱ्यांना हस्तांतरित केला जाईल, असे शाह म्हणाले.

या कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री बी. l वर्मा, सहकार सचिव ज्ञानेश कुमार, ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल, एनडीडीबीचे अध्यक्ष आणि एनसीओएलचे प्रमुख मिनेश सी शाह आणि एफएसएसएआय सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) जी कमला वर्धन राव उपस्थित होते.

NCOL चे मुख्यालय गुजरातमध्ये आहे. 'मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट २००२' अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे मुख्य प्रवर्तक राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आहे. सरकारने नुकत्याच स्थापन केलेल्या तीन नवीन सहकारी संस्थांपैकी NCOL ही एक आहे. इतर दोन सहकारी संस्था प्रमाणित बियाणे आणि निर्यात क्षेत्रात काम करतात. देशभरात ७.८९ कोटी सहकारी संस्था आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tobacco Farming : जिनेव्हा येथील परिषदेवरून तंबाखू उत्पादकांची संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेत वादाची ठिणगी; प्रकरण काय?

Agriculture Entrepreneur: चारा, बेणे विक्रीतून साधले करिअर!

Maharashtra Biodiversity: जैवसंपदा समित्यांना १.५८ कोटींचा निधी

Sugar Exports: देशातून १५ लाख टन साखर निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील, मोलॅसिसवरील निर्यात शुल्कही हटवले

Farmer Welfare: शेती आणि शेतकरी वाचला तरच देश पुढे जाईल

SCROLL FOR NEXT