Rabies Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Rabies Disease : रेबीज आजाराचे नियंत्रण

Human Health : भारतामध्ये रेबीज या आजारामुळे दरवर्षी ३० ते ६० टक्के मृत्यू हे १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होतात, कारण लहान मुलांमध्ये श्वान दंशाची शक्यता जास्त असते. रेबीज टाळण्यासाठी श्वानांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

डॉ. आदित्य मोहिते, डॉ. सचिदानंद साखरे

Disease Control Management : भारतामध्ये रेबीज या आजारामुळे दरवर्षी ३० ते ६० टक्के मृत्यू हे १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होतात, कारण लहान मुलांमध्ये श्वान दंशाची शक्यता जास्त असते. रेबीज टाळण्यासाठी श्वानांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.

आजाराचा प्रसार संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून होतो. माणसांच्या अंगावरची उघडी जखम संसर्गजन्य श्वानाने चाटल्यामुळे त्यांच्या लाळेतून रेबीज विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. जवळपास ९५ टक्के आजार हा श्वानांमुळे होतो. याचबरोबरीने मांजर, कोल्हा, मुंगूस यांच्यापासून देखील रेबीजचा प्रसार होतो.

आजाराची लक्षणे

साधारणतः रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे एक आठवडा ते एक

वर्षापर्यंत दिसू लागतात. परंतु सामान्यतः ते दोन ते तीन महिन्यांपर्यंत काही लक्षणे दिसून येतात.

लक्षणे कमी व जास्त दिवसात दिसून येण्यासाठी काही घटक कारणीभूत ठरतात, जसे की श्वानाने चावा घेतलेली जागा, लाळेतील विषाणूचे प्रमाण, विषाणूचा प्रकार (स्ट्रेन), पीडित व्यक्तीचे वय आणि रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी घटक कारणीभूत ठरतात.

पीडित माणसाच्या किंवा जनावराच्या मेंदू जवळ जनावरांनी चावा घेतलेला असेल किंवा विषाणूचा मात्रा चावलेल्या जागी जास्त असेल तर संसर्गाची चिन्हे लवकर दिसतात.

माणसांमधील लक्षणे

चावा घेतलेल्या अंगाला वेदना आणि मुंग्या येतात. हे ३५ ते ६५ टक्के प्रकरणांमध्ये दिसून येते.

हायड्रोफोबिया म्हणजे पाणी पिताना भीती वाटते.

श्वानांच्यामधील लक्षणे

सुमारे तीन महिन्याच्या कालावधीनंतर श्वानामध्ये संसर्गाची लक्षणे दिसू लागतात.

श्वानाच्या वागण्यात बद्दल जाणवण्यास सुरवात होते, भुंकण्याच्या आवाजामध्ये बदल दिसतो.

खाण्याच्या सवयीमध्ये बदल होतो. श्वान अन्न सोडून असामान्य न खाण्याजोग्या वस्तू चघळायला लागतो त्याला ताप, उलट्या, जास्त लाळ गाळणे, खालच्या जबड्याच्या अर्धांग वायू चिंता, अस्वस्थता, अंकुचन, अर्धांगवायू होण्यास सुरवात होते, ज्यामुळे पाच ते सात दिवसात मृत्यू होतो.

श्वानामध्ये रेबीज चे दोन प्रकार आढळून येतात. पहिल्या प्रकारात प्रामुख्याने अर्धांगवायू दिसून येतो. वर्तन बदलते. दुसऱ्या प्रकारात श्वान आक्रमक झालेले दिसतात. चावण्याची प्रवृत्ती दिसते.

उपाययोजना

शरीरात प्रवेश केलेले विषाणू मज्जा संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा प्रभाव कमी करणे आवश्यक आहे. चाव्याच्या जखमा आणि ओरखडे तपासून तातडीने उपचार करावेत.

स्थानिक जखमेच्या उपचारांमुळे रेबीज होण्याची शक्यता ८० टक्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

कमीत कमी १५ मिनिटे जखमा ओरखडलेली जागा आणि त्यालगतची जागा मुबलक साबण आणि पाण्याने धुवावी. शक्यतो वाहत्या नळाखाली ताबडतोब जखम धुवावी.

जखमेच्या ठिकाणी कॅथेटरचा वापर करावा.

औषधोपचार केल्यावर जखम पूर्णपणे साफ केल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्याने विषाणूनाशकाचा वापर करावा.

प्रतिजैविके आणि टिटॅनस विरोधी उपाय योजना करावी.

रेबीज रोखण्यासाठी लस घेणे फायदेशीर आहे.

रेबीज नियंत्रणासाठी पाळीव तसेच भटक्या श्वानांचे लसीकरण महत्त्वाचे आहे.

सर्व पाळीव श्वानांची नोंदणी आणि परवाना घेणे आवश्यक आहे.

डॉ. आदित्य मोहिते, ७०८३८५२२१३

(सहायक प्राध्यापक, आर आर पशुवैद्यकीय महाविद्यालय, देवळी, राजस्थान)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Fight: महाराष्ट्र विधानसभा लॉबीमध्ये हाणामारी; आमदारांचे कार्यकर्ते भिडले, अटक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप

Tree Plantation : सदाहरित वृक्ष लागवडीसाठी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चा पुढाकार

Vankranti : जाखोरीची विचारक्रांतीकडून ‘वनक्रांती’कडे वाटचाल

Warehouse Finance Receipt: गोदाम पावती वित्तपुरवठा विस्ताराची संधी

HTBT Cotton: धोरणफजिती आणि संकेताचा खेळ

SCROLL FOR NEXT