Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : अलमट्टीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक, कृती समितीचे निवेदन

Karnataka Almatti Dam : कर्नाटक शासनाला अलमट्टीमधील पाणीपातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यात भाग पाडावे. असे कृती समितीने निवेदन दिले.

sandeep Shirguppe

Kolhapur Collector : कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाणीपातळी जूनपासून ऑगस्टपर्यंत किती असावी, याची निश्चिती कायद्याने केली आहे. केंद्रीय जल आयोगाने याबाबत निर्देशही दिले आहेत. मात्र, याचे पालन होत नाही. जूनपासून ऑगस्टपर्यंत पाणीपातळी कायद्याप्रमाणे राखली जात नाही. याचा थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर होत दोन वेळा महापुराला सामोरे जावे लागले होते.

त्यामुळे अलमट्टीच्या पाणीपातळीवर महाराष्ट्र शासनाने समन्वयाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अशी भूमिका कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवावी, असे निवेदनही त्यांनी आज दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.

महापुराचे अभ्यासक विजय दिवाण म्हणाले, 'अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण आहे. अमलट्टी धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे. २०१९, २०२० यावेळी ही पातळी ओलांडल्याने महापूर आले.

यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले जलसंपदाचे अभियंता अलमट्टी धरणावर ठेऊन दैनंदिन पाणीपातळी नोंदवावी. कर्नाटक शासनाला अलमट्टीमधील पाणीपातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यात भाग पाडावे. अन्यथा, पुन्हा महापुराचा धोका निर्माण होईल. कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. आवश्यक ती माहिती, आकडेवारी दिली जात नाही. याबाबत भूमिका मांडण्यासाठी ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी संजय कोरे, प्रदीप वायचळ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID Block: अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘फार्मर आयडी’ ब्लॉक करा: राज्यमंत्री आशीष जयस्वाल

Seed Fertilizers Black Market: बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: मेघना साकोरे-बोर्डीकर

Pre Monsoon Preparation: शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे आतापासूनच नियोजन करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Sugarcane Crushing: खानदेशात २३ लाख टनांवर ऊस गाळप

SCROLL FOR NEXT