Agriculture Crisis : ब्राह्मणगाव परिसरात दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ब्राह्मणगाव येथील शेतकरी दादाजी सूर्यवंशी यांनी एक एकर मका पिकावर नांगर फिरविला. .पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने मका, कांदा, बाजरी, कपाशी, सोयाबीनसह अन्य पिकांवर परिणाम झाला आहे. .Rainfall Deficit: पावसाअभावी खरीप संकटात.ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यातही अपेक्षित पाऊस न झाल्याने उत्पादन घटण्याची भीती असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे..Rain Deficit: पश्चिम विदर्भात महिनाभरापासून पाऊस गायब.धरणांच्या उगम क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणे भरली असली, तरी सर्वदूर पाऊस न झाल्याने भूजलपातळी खालावण्याची चिंता आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. .दरम्यान, सव्वा एकर क्षेत्रात कोथिंबीरला भाव नसल्याने शेतकरी अरुण शिवाजी अहिरे यांना कोथिंबीरवर रोटर फिरविण्याची वेळ आली आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गणरायाच्या आगमनासोबत तरी मोठा पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.