Farmer Company Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Produce : कृषिमाल विक्रीसाठी शेतकरी कंपन्यांशी करार

सुदर्शन सुतार

Solapur News : महिलांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी १५ पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विपणन कंपन्या यांच्यात सामंजस्य करारासाठी मुंबईत कृषिमूल्य साखळी भागीदारी बैठक झाली.

त्यात बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील यशस्विनी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचा समावेश होता. या वेळी उत्पादनासंबंधी काही करार झाल्याची माहिती कंपनीच्या अध्यक्ष अनिता माळगे यांनी दिली.

मुंबईत झालेल्या या कराराप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारामुळे बोरामणीसह सोलापूर जिल्हा आणि राज्याच्या विविध भागांतील तनिष्का व अन्य महिला शेतकरी आपला कृषिमाल अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केटसह अनेक नामवंत कंपन्यांना थेट विकू शकतील.

भरड धान्यांचे पदार्थ अंगणवाडी पोषण आहारासाठी देण्याचा निर्णयही लवकरच होईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन- ‘मित्रा’ संस्था, कृषी विभाग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (व्हीएसटीएफ) यांच्या वतीने ही घेण्यात आली. या वेळी सोलापूर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने हेही उपस्थित होते.

या बैठकीत मका, बाजरी, कापूस, कडधान्ये, सोयाबीन, फळे, भाजीपाला आदी शेतकरी व उत्पादकांच्या ५९ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात यशस्विनी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीसह भूसेवा अॅग्रो कंपनीचे सचिन थिटे, खंडोबा अॅग्रोचे परमेश्‍वर कुंभार, ‘व्हीएसटीएफ’च्या आरती महाजन, मूल्यसाखळी तज्ज्ञ कुलदीप जाधव, सचिन शिंदे, अविनाश भोसले, योगेश माळगे यांचा समावेश होता.

शेतीचे क्षेत्र सबसिडीतून, नुकसान भरपाईतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्वारीपासून बनविण्यात आलेल्या बिस्किटांची मंत्रालयात थेट विक्री करण्याबाबतची ऑर्डर संस्थेला मिळाली.
- अनिता माळगे, अध्यक्षा, यशस्विनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, बोरामणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT