Warna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Heavy Rain : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस

Rain Update : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी सुरू असून गेल्या चोवीस तासांत ८५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी सुरू असून गेल्या चोवीस तासांत ८५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे. वारणा धरणातून २४६५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी-अधिक पाऊस सुरू आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण तर सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने भुईमुग, सोयाबीन या पिकांसह अन्य नुकसान होऊ लागले आहे.

पाऊस भात पिकासाठी उपयुक्त आहे. धरणाचे चार वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरने उचलून सांडव्यातून १००० तर विद्युत निर्मितीतून १४६५ असा एकूण २४६५ क्युसेकने पाण्याचा वारणा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. रेठरे-कोकरूड बंधारा पाण्याखाली गेला असल्याने शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.

शिराळा तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला असून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. तर जिल्ह्याच्या इतर तालुक्यात दुपारपर्यंत हलका पाऊस झाला, दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cyclosinone Herbicide : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्टला नोटीस; अप्रमाणित तणनाशक विक्रीचं प्रकरण

Kharif Crop Prices: खरीप पिकांच्या भावात तेजी राहणार का?

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

SCROLL FOR NEXT