Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ची पडताळणी सुरूच ठेवा: मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींची छाननी सुरू ठेवा. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी करून पैसे वसूल करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींची छाननी सुरू ठेवा. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी करून पैसे वसूल करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेतल्याने त्यांचा लाभ थांबविण्यात आला होता. यामध्ये काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची गंभीर बाब समोर आली होती. या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करा, त्यांच्या घरी विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. ज्या प्रकरणांत पुरुष दोषी असतील तर त्यांच्याकडून वसुली करा, असे निर्देश देण्यात आले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.

या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६ लाख ३४ हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे २ कोटी २५ लाख पात्र ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा हप्ता वितरित केला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली.

अपात्र महिलांचा लाभ बंद करा

सरकारी नोकरदार, विविध योजनांच्या लाभार्थी आणि अन्य निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात यावा. तसेच त्यांची सातत्याने पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ही प्रक्रिया सुरू ठेवा, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Flood : शेतकऱ्यांनो, खचू नका; सरकार तुमच्या पाठीशी

Nanded Flood : संसार उघड्यावर, जगायचे कसे?

Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा

Sugarcane Rate : मांजरा साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी दर

Landslide : पावसाचा जोर वाढला; करूळ घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT