Water Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bunds : बोरी नदीवर आठ साखळी बंधाऱ्यांची निर्मिती

Bori River : काटवन परिसरातील विराणे येथे बोरी नदीवर सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आठ साखळी बंधाऱ्यांची निर्मिती झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : काटवन परिसरातील विराणे येथे बोरी नदीवर सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आठ साखळी बंधाऱ्यांची निर्मिती झाली आहे. यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने बहुतांशी बंधारे भरले आहेत. यामुळे जमिनीत पाणीपातळी वाढली आहे. विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यात वाढ झाली आहे. परिणामी, परिसरात हिरवाई नटणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून विविध योजनेतून हे शक्य झाले आहे. शहराच्या उत्तरेस पूर्व-पश्‍चिम काटवन परिसर पसरलेला आहे. परिसरात पूर्वीपासून मोठी नदी, पाट, शेतीसाठी धरणाची व्यवस्था नाही. जे काही बागायत आहे ते शेतकऱ्यांनी स्वतः केले आहे. पूर्वी येथे एकच पिक घेतले जात असे आता दोन ते तीन पिके घेणे शक्य होईल.

पूर्वी बोरी नदीला आलेले शंभर टक्के पाणी वाहून जात असे. म्हणून परिसरात एकच खरीपाचे पिक घेतले जात असे. मोजक्याच शेतकऱ्यांजवळ पाण्याची व्यवस्था होती. परंतु, आता बंधाऱ्यांच्या आजूबाजूला शेतजमीन हिरवाईने नटणार आहे. बंधाऱ्यांचे पाणी जमिनीत मुरून विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे.

‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन बोरी नदीवर कजवाडे पाठोपाठ विराणे शिवारात बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. अजूनही बोरी नदीवर तीन ते चार बंधारे नियोजित आहेत. तसेच, गाव परिसरात ओढे नाल्यांवर देखील बंधारे बांधण्यात येतील. शेतकऱ्यांनी पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे.
दादा भुसे, पालकमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT