Agriculture Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : पेरण्यांची गती कायम; ८० टक्के पेरा पूर्ण

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात जूनमध्ये पाऊसमान कमाल क्षेत्रात बरे होते. यामुळे पेरण्यांची गती कायम आहे. मागील हंगामाच्या तुलनेत पेरा अधिक क्षेत्रात झाला आहे. पेरा ८० टक्के झाला असून, सर्वाधिक लागवड कापसाची झाली आहे. काही भागात पेरण्या सुरू असल्याची माहिती आहे.

मागील हंगामात जूनअखेर किंवा १-२ जुलैपर्यंत ४० टक्केही पेरा खानदेशात झाला नव्हता. फक्त पूर्वहंगामी कापसाची लागवड पूर्ण झाली होती. परंतु यंदा जूनअखेर खानदेशात चांगला पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत एकूण १२८ मिलिमीटर पाऊस ३ जुलैअखेर झाला आहे.

जळगाव जिल्ह्याचे एकूण पाऊसमान ७६५ मिलिमीटर, धुळ्याचे ५६५ मिलिमीटर व नंदुरबारचे ८५४ मिलिमीटर एवढे एकूण पाऊसमान आहे. सप्टेंबरअखेर एवढा पाऊस खानदेशात अपेक्षित असतो. धुळे व नंदुरबारातही जूनमधील पावसाची सरासरी चांगली असून, तेथेही एकूण ११० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस आहे. काही मंडलांत कमी पाऊस आहे. परंतु पेरणीसाठी अनुकूल स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी कापूस, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, बाजरीची पेरणी केली आहे.

मागील हंगामा जूनमध्ये २२ दिवस पावसाचा खंड होता. जुलैतही पहिल्या आठवड्यानंतर पाऊस आला. यात पाऊस सर्वत्र सारखा नव्हता. यामुळे उडीद, मुगाचा पेरा हवा तेवढा होऊ शकला नव्हता.

मंक्यासही पसंती

खानदेशात खरिपातील पिकांची एकूण १४ लाख हेक्टरवर (केळी व ऊस वगळता) पेरणी केली जाते. त्यात जळगाव जिल्ह्यात सात लाख ६७ हजार हेक्टरवर, धुळ्यात चार लाख हेक्टरवर तर नंदुरबारात पावणेतीन लाख हेक्टरवर खरिपातील पिके असतात. यात कापसापाठोपाठ यंदा मका, सोयाबीनची पेरणी केली जात आहे.

अनेकांनी उडदासही पसंती दिली आहे. उडीद, मूग पेरणी पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मुगाची सुमारे १५ हजार हेक्टरवर तर उडदाची सुमारे १६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीची लागवडदेखील जळगाव जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर झाली आहे. बाजरी, सोयाबीन पेरणी काही भागात सुरू आहे. मक्याची खानदेशात सुमारे एक लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड पूर्ण झाल्याची माहिती मिळाली.

कापूस लागवड अधिक

खानदेशात सर्वाधिक लागवड कापसाची केली जाते. कापूस लागवडीत मागील होन हंगाम घट झाल्याचे दिसत आहे. परंतु कापसाएवढी लागवड अन्य कुठल्याही पिकाची तिन्ही जिल्ह्यांत केली जात नाही. जळगाव जिल्ह्यात कापसाची सुमारे साडेचार लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात पाच लाख ५० हजार हेक्टरपर्यंत राहील, अशी अपेक्षा आहे.

धुळ्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. नंदुरबारातही सुमारे ८० हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. खानदेशात यंदा साडेआठ लाख ते आठ लाख ४० हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Agriculture Processing : ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

SCROLL FOR NEXT