All Party Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

All Party Meeting : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत; तोडगा काढण्यासाठी मुदत देण्याचा ठराव

Swapnil Shinde

Maratha Andoalan Issue : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्य सरकारच्यावतीने तातडीने सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व विविध पक्षांचे ३२ नेते उपस्थित होते.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवत असल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याबाबत एकमत झाले. परंतु जुन्या कुणबी नोंदी तपासणी आणि कायदेशीर बाबी तपासणीसाठी आणखी मुदत देण्याबाबत ठराव करण्यात आला. मराठा आंदोलक हिंसक होत असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक असून मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा ठराव सर्व नेत्यांच्यावतीने करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT